आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम; नैराश्याचा धोका; अमेरिकेतील कामगार विभागाचे सर्वेक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- एका आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम होत असेल तर नैराश्य आणि तणाव वाढण्याची शक्यता दुपटीने वाढते. तारुण्यात याचे परिणाम दिसत नसले तरी ३५ ते ४० वर्षांनंतर शरीर आणि मेंदूवर अति कामाचे दुष्परिणाम होऊ शकतात. अमेरिकेतील कामगार विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे वास्तव समोर आले आहे.


कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामगार सांख्यिकी विभागाने जवळपास ५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. त्याच आधारावर विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. अभ्यासासाठी सर्व लोकांना दोन पद्धतीच्या गटांमध्ये विभागण्यात आले. पहिला गट आठवड्यामध्ये ४० ते ४५ तास काम करणाऱ्यांचा, तर दुसरा गट आठवड्यात ५० तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्यांचा होता. दोन्ही गटातील लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सहभागी असलेले न्यूयॉर्क विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अजीजी सिसेक्स म्हणाले की, 'आम्ही निवडलेल्या लोकांमध्ये काही लोक तर ६० तासांपेक्षा अधिक काम करणारेही होते. त्यांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले.


मानसिक, शारीरिक आरोग्यासह नातेसंबंधांमध्येही परिणाम झालेले अभ्यासात आढळले. ६० तासांपेक्षा अधिक काम करणारे लोक अंथरुणावर पडल्या पडल्याही आपल्या कामातील समस्यांबद्दल विचार करत राहतात. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याचमुळे अधिक काम करणारे ५०% पेक्षा जास्त लोक ५ तासांचीही चांगली झोप घेऊ शकत नाहीत. ४५ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणारे ४३% लोक एकटेपणाचे शिकार होत असल्याचे ते सांगतात.' कुठल्याही व्यक्तीची शारीरिक व मानसिक आरोग्य ठीक राहण्यासाठी तसेच उत्पादकता टिकवण्याच्या दृष्टीने आठवड्यात ४० तास काम असायला हवे. यापेक्षा अधिक काम झाले तर तणाव वाढण्याची शक्यता १.७४ पट आणि नैराश्याची शक्यता १.६६ पट वाढते.


सहा वर्षे चालले संशोधन, ४३% लोक एकटेपणाचे शिकार


कामाचे तास ५५ तासांपेक्षा जास्त झाल्यास मेंदू थकायला लागतो
४० तास काम : आरोग्यावर परिणाम नाही.
४० ते ४५ तास काम : थकवा जाणवत असल्याची तक्रार. मानसिक, शारीरिक आरोग्य मात्र चांगले राहते.
४५ ते ५५ तास काम : शारीरिक समस्या उद््भवतात. तणाव वाढण्याची शक्यता
५५ तासांपेक्षा जास्त काम : तणाव आणि नैराश्याची शक्यता दुप्पट वाढते.


अधिक काम करणाऱ्या २२% लोकांचा संशोधनादरम्यान झाला मृत्यू
- संशोधन ६ वर्षांपर्यंत चालले. ४५ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या लोकांपैकी २२% लोकांचा संशोधनादरम्यान मृत्यू झाला.
- सामान्य काम करणाऱ्या गटातील १०% लोकांचा मृत्यू झाला.
- ४५ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या ४३% लोक एकटेपणाचे शिकार होत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

बातम्या आणखी आहेत...