आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • More Than 5 Million Tourists Visit To India, World's Online Travel Market Will Go Up To 39 Lakh Crore

भारताला २०१८ मध्ये १.७४ कोटी पर्यटकांची भेट, जगाचा ऑनलाइन ट्रॅव्हल बाजार २०२३ पर्यंत ३९ लाख कोटींवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगात दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन ऑर्गनायझेशन (यूएनडब्ल्यूटीओ) अंतर्गत हा दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिन लोकांना पर्यटनाचे महत्त्व समजावे म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक पर्यटन दिनाचे लक्ष्य- कौशल्य, शिक्षण आणि नोकऱ्या आहे. २०१८ मध्ये जगात १४०.१ कोटी पर्यटक विदेशात गेले. यातील सर्वात पर्यटक फ्रान्समध्ये जाणारे होते. यानंतर स्पेन, अमेरिका आणि चीनचा क्रमांक आहे. वर्ष २०१८ मध्ये तुर्कस्तान आणि व्हिएतनाममध्ये पर्यटन क्रमश: २१.७%, १९.९% टक्के वाढ झाली, तर भारताने १२.१% वाढ नोंद केली.
 

८.१ टक्के याच क्षेत्रातून येतो
देश    पर्यटक
फ्रान्स    8.94 कोटी
स्पेन    8.82 कोटी
अमेरिका    7.96 कोटी
चीन    6.29 कोटी
इटली    6.21 कोटी
भारत    1.74 कोटी
> २०१८मध्ये पर्यटन क्षेत्राचे भारताच्या जीडीपीत योगदान ९.२% होते. 
 

ऑनलाइन ट्रॅव्हल बाजार
स्टॅटिस्टा ग्लोबल कन्झ्युमर सर्व्हे २०१८ नुसार दरवर्षी जगात ऑनलाइन बाजार वाढत आहे. २०१७ पर्यंत हा बाजार ३६१८४ कोटी डॉलरचा होता. जो २०२३ पर्यंत वाढून ५५ हजार कोटी डॉलरपर्यंत जाण्याचे अनुमान आहे.
 

ऑनलाइन कन्झ्युमर-
वयाप्रमाणे समजून घेतले तर २५ ते ३४ वयोगटातील लाेक सर्वात जास्त ऑनलाइन ट्रॅव्हल मार्केटिंगचा वापर करतात. सध्या वरिष्ठ नागरिकात हा ट्रेंड कमी दिसतो.
 

टूर अँड ट्रॅव्हल क्षेत्रात महिलांची भागीदारी  
ट्रॅव्हल अँड टुरिझम ड्रायव्हिंग वुमेन सक्सेसच्या अहवालानुसार भारताच्या टूर अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रात महिलांची भागीदारी सर्वाधिक रशियात राहिली. येथील अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी ४५% पेक्षा जास्त राहिली, तर टूर अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रात महिलांची भागीदारी सुमारे ५५% राहिली. भारतात टूर अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रात महिलांची भागीदारी १५% राहिली.