आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 50 Lakh People Are Likely To Visit Jagannathpuri, 1300 Hattel Booked From Now

५० लाखांपेक्षा जास्त लोक जगन्नाथ पुरीला येण्याची शक्यता, १३०० हाॅटेल आतापासूनच बुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी, भुवनेश्वर - बालीगाव जगन्नाथपुरी येथून फक्त २८ किमी दूर आहे. येथील तुलसीवनातून रोज भगवान जगन्नाथाच्या पूजेसाठी तुळशीपत्रे जातात. फनीमुळे उद्ध्वस्त झालेल्या या गावात अद्याप वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. गावाची अर्थव्यवस्था चालवणारी नारळाची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. धानाची शेती बरबाद झाली आहे. गावातील जवळपास २०० घरांपैकी एकही घर असे नाही, जेथे फनीचा फटका बसलेला नाही. पण ही सगळी स्थिती एकीकडे आहे. या समस्यांमुळे गावातील लोकांची भगवान जगन्नाथाबद्दलची भक्ती तिळमात्रही कमी झाली नाही. अंगावर फक्त गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले नारायण पोलाई म्हणतात की, आमची नारळाची ४५ झाडे मोडली आहेत. साडेतीन एकरवरील धानाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तरीही मी आणि ग्रामस्थ जगन्नाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी पुरीला निश्चित जाणार आहोत. बालीगाव दासियापीठ या धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. पोलाईप्रमाणेच येथे ४ जुलै ते १५ जुलैपर्यंत असणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेसाठी प्रत्येक जण उत्साहित आहे.
पर्यटन मंडळाचे सहायक संचालक विजय जैना यांनी सांगितले की, या उत्सवात ५० लाखांवर लोक येण्याची शक्यता आहे. सुवर्णशृंगाराच्या दिवशीच १० लाखांवर लोक येतील. पुरीत सुमारे १३०० हाॅटेल आहेत, त्यात मे महिन्यात १० टक्केही ग्राहक नव्हते. पण आता हाॅटेलच्या सर्व खोल्यांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.