आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन नियम-कायद्याने अडचणी वाढल्या; मार्च 2019 पर्यंत देशातील अर्ध्यापेक्षा जास्त एटीएम होणार बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुढील चार महिन्यांत म्हणजेच मार्च २०१९ पर्यंत देशभरातील सुमारे अर्ध्यापेक्षा जास्त एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकूण २५,६६२ एटीएम आहेत. जर असे झाले तर त्याचा परिणाम पूर्ण देशात होईल. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना नगदी काढण्यासाठी त्रास होण्याची शक्यता आहे. एटीएम उद्योग क्षेत्रातील संघटना कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (कॅटमी)च्या वतीने बुधवारी हा इशारा देण्यात आला आहे.  


संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या २.२८ लाख एटीएम आहेत. यात १.१३ लाख एटीएममधील एक लाख ऑफ साइट एटीएमचा समावेश आहे. याव्यतिरिक्त १५,००० व्हाइट लेबल एटीएम आहेत. मात्र, नवीन नियमांनुसार एटीएमच्या संचालनालयाचे काम व्यावहारिक राहिलेले नाही. एटीएम कंपन्या त्यांची संख्या हळूहळू कमी करत आहेत. सध्यातरी छोट्या शहरातील एटीएम बंद करण्यात येत आहेत. जर बँकांनी त्यांना येणाऱ्या खर्चाची भरपाई केली नाही तर मोठ्या प्रमाणातील करार रद्द झाल्याने अनेक एटीएम बंद होतील.  


असे झाल्यास देशात पुन्हा नोटबंदीसारखे वातावरण निर्माण होण्याची भीती कॅटमीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मार्चपर्यंत देशात २,२१,६५८ एटीएम कार्यरत होते.  

 

नवे नियम-कायद्याने अडचणीत वाढ 
एटीएमचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी जे नवे नियम तयार करण्यात आले आहे त्यानुसार जुनी एटीएम चालवणे अवघड झाले असल्याचे कॅटमीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त नगदीचे व्यवस्थापन करतानाचे नियम आणि नगदी भरताना पाळायचे नियमही तयार करण्यात आले आहेत. एटीएम कंपन्या, ब्राऊन लेबल आणि व्हाइट लेबल एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांना नोटबंदीच्या काळातील मार अद्यापही झेलावा लागत आहे. 

 

 ३,५००० कोटींचा खर्च 
 नवीन तंत्रज्ञानाच्या हिशेबाने एटीएममध्ये बदल करण्यासाठी बँकांना बराच जास्त खर्च करावा लागणार आहे. अहवालानुसार या मिशनमध्ये कॅश लॉजिस्टिक आणि कॅसेट स्वॅप मेथडमध्ये बदल करण्यासाठी ३,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च बँका उचलण्यास तयार नसेल तर एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्या ही एटीएम बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात. बँकांसोबत करार करताना या कंपन्यांना या खर्चाचा अंदाज आला नव्हता. यातील बरेचसे करार पाच वर्षांसाठी करण्यात आलेले आहेत.

 

इतर प्रमुख राज्यांतील एटीएम
- मध्य प्रदेश-१०,०३३
- छत्तीसगड -३,२५४
- राजस्थान-९,१८७
- दिल्ली- ८,८५२
- पंजाब- ७,४९२
- हरियाणा- ६,४९८
- बिहार - ७,८७९
- झारखंड- ३,७६७
- हिमाचल प्रदेश- १,१७०
(रिझर्व्ह बँकेच्या मार्च २०१८ च्या आकडेवारीनुसार)

 

देशात सर्वाधिक २५,६६२ एटीएम महाराष्ट्रात

- मेट्रो शहर- ६०,६४३   
- मोठी शहरे- ५९,१३४  
- अर्धशहरी क्षेत्र- ६१,३१४  
- ग्रामीण- ४०,५६७  
- एकूण- २,२१,६५८  

 

अव्वल पाच राज्ये  
एटीएमची संख्या 

- महाराष्ट्र- २५,६६२  
- तामिळनाडू- २५,१४८  
- उत्तर प्रदेश- १९,८५५  
- कर्नाटक- १७,६८३  
- गुजरात- ११,९१४ 

बातम्या आणखी आहेत...