आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅम्सटर्डमध्ये वाढत्या पर्यटकांमुळे शासनाने पर्यटनाच्या शासकीय जाहीरातींवर लावली बंदी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅम्सटर्डम- नेदरलंडची राजधानी असलेले एम्सटर्डम शहर आपले सौंदर्य, छोटी-छोटी घरे आणि मोठ्या नद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. या सर्व आकर्शणामुळेच दरवर्षी लाखों पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. पण दिवसेंदिवस वाढत असलेल्या या पर्यटकांच्या संख्येमुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे शासनाने देशाच्या पर्यटनाविषयी केलेल्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 


या देशातील लोकांना पर्यटकांचा एवढा कंटाळा आला आहे की, ते स्वतः पर्यटकांना आमच्या देशात न येता, दुसऱ्या ठिकाणी जायला सांगत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, एम्सटर्डनमध्ये सायकलचा खूप वापर होतो. त्यामुळे तिथे गर्दीसारखे ट्रॅफिक होत नाही. याच गोष्टींचा फायदा घेऊन पर्यटक रस्त्यावरच खेळाचे मैदान बनवतात.


इतर शहरांसारखी अवस्था होऊ नये
डच आर्किटेक्चरल फर्मची पार्टनर अॅलन वान लून यांनी सांगितले की, आमच्यावर या पर्यटनाचा खूप दबाव आहे. खरतर लोकांना अॅम्सटर्डम शहराचे खूप आकर्षण असल्यामुळे ते फिरण्यासाठी येतात. पर्यटकांद्वारे नेदरलंडला वार्षिक 91.5 बिलियन डॉलर (6 लाख कोटी रू.) उत्पन्न मिळते. पण अधिक पर्यटकांचा भार पडल्यामुळे शहराची सांस्कृतिक हानी होत आहे.

 

अॅम्सटर्डनमध्ये येणाऱ्या सर्व विमानाच्या तिकिटांचा दर कमी असल्याने इटलीच्या वेनिस आणि यूरोपातील इतर पर्यटकही येथे मोठ्या संख्येने येत आहे. मागील वर्षी येथे 1 कोटी 80 लाख पर्यटक आले होते. तसेच, 2030 पर्यंत ही संख्या 4 कोटी 20 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. अॅम्सटर्डन शहराची सध्याची लोकसंख्या 8.22 लाख आहे. 

 

डेस्टिनेशन मॅनेजमेंटवर भर
अॅम्सटर्डम प्रशासनाने वर्षाच्या सुरूवातीला सादर केलेल्या दृष्टीकोण 2030 या अहवालात म्हटले होते की, शासन या शहराला लोकप्रिय स्थान करण्याऐवजी व्यवस्थापन क्षेत्र करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. या कागदपत्रात पर्यंटकांच्या वाढत्या संख्येवर अंकूश ठेवण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. कारण, पर्यंटकांची वाढती संख्या त्यांच्या देशासाठी हानीकारक आहे आणि याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.