आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Morgan Had A Special Discussion With The Entire Team; Root Explained The Meaning Of 3 Tigers And A Crowen On Jersey

मॉर्गनने संपूर्ण टीमशी खास विजयांवर चर्चा केली होती; रूटने जर्सीवरील ३ वाघ व एक क्राऊनचा अर्थ समजावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एजबेस्टन - २५ तारखेला सायंकाळी क्रिकेटचा मक्का लाँर्ड््सवर इंग्लंड टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये निराशा व शांतता होती. खेळाडूंचे खांदे झुकले होते. चाल हळुवार झाली होती. कारण - एक महिन्यापूर्वी क्रिकेट विश्वचषकातील सर्वात मोठा दावेदार म्हटली जाणारी टीम सलग दोन सामन्यांत पराभूत होत स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता वाढली होती. इंग्लंडची टीम चांगली आहे यात शंका नाही, मात्र कर्णधार इयान मॉर्गनवर झुकलेले खांदे सरळ करण्याची मोठी जबाबदार होती. खेळाडूंना कसे प्रोत्साहन दिली पाहिजे यासाठी मॉर्गनने टीमचा वरिष्ठ खेळाडू जो रूट आणि मानसोपचारतज्ञ डेव्हिड यंगला बोलावले. या दोघांशी चर्चा केल्यानंतर माॅर्गनने संपूर्ण टीमची बैठक बोलावली. ही सामन्याच्या नियोजनासाठी बैठक नव्हती, उलट “संस्कृती बैठक’ होती. मॉर्गनने बैठकीला नाव दिले होते. उद्देश होता - टीमला इंग्लंड क्रिकेट टीमची संस्कृती, त्यांच्या ताकदीची आठवण करून देणे.


बैठकीची सुरुवात मॉर्गनने केली. त्याने प्रथम गमतीदार बोलणे केले. इंग्लंड टीमने यापूर्वी मिळालेल्या शानदार विजयावर बोलायला सुरुवात केली. यामध्ये हळूहळू संघाचा प्रत्येक खेळाडू सहभागी होऊ लागला. ज्या खेळाडूने त्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती त्याच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. टीमच्या बैठकीमधील निराशाजनक वातावरण सामान्य आणि जुन्या आठवणीत आल्यानंतर मॉर्गनने आपली बाजू मांडली. त्याने म्हटले की, आपण गेल्या ३-४ वर्षंापासून जबरदस्त क्रिकेट खेळत आहोत. आपण जगातील नंबर वन टीम बनलो. २-३ सामने गमावल्यानंतर सत्य बदलले जाऊ शकत नाही. आपली टीम सध्या जगातील सर्वात मजबूत टीम आहे. 


आपला खेळ पराक्रमी असून हीच आमची ओळख आहे. आपल्याला मोठ्या स्पर्धेत २-३ पराभवांचा सामना करावा लागला त्यामुळे चिंता वाढणे शक्य आहे. मात्र, त्यामुळे आपण आपल्या खेळण्याची पद्धत बदलू शकत नाही. मॉर्गनने टीमला उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहोचण्याबाबत म्हटले की, इंग्लंडकडे २० वर्षांत विश्वचषक जिंकण्याची एवढी चांगली संधी मिळाली नाही. पुढील १० वर्षांतदेखील मिळणार नाही. आपल्याला त्या २ पराभवांचे आभार मानावे लागेल. त्याने आपल्यासाठी समीकरण चांगले केले. सरळ गोष्ट ही आहे की - आता आपल्यापुढे ४ सामने (२ गटातील, उपांत्य, अंतिम) आहेत. आपल्याला चारही जिंकायचे आहेत. वी. आर. चॅम्पियन.
 

 मॉर्गनने असे वाढवले संघाचे मनोबल

त्यानंतर मॉर्गनने जो रूटला बोलावले. रूट आणि मॉर्गनने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावेळी टीमला जर्सीवर बनवलेल्या प्रतीकाचा अर्थ सांगितला. ज्यात ३ वाघ आणि एक क्राऊन बनवले आहे. रूटने पुन्हा एकदा टीमला त्याचा अर्थ समजावला. म्हटले की - जर्सीवरील क्राऊन आपल्या टीम आणि देशाचे प्रतिनिधित्व करते. देशातून आपण नशीबवान आहोत, ज्यांना देशाकडून खेळण्याची संधी मिळाली ही आठवण करून देतो. आपल्याला या क्राऊनच्या प्रतिष्ठेसाठी खेळायचे आहे आणि आपण मैदान सोडल्यावर आगामी पिढीतील खेळाडूंवर जबाबदारी सोपवायची आहे. त्याच्या खाली ३ वाघ आहेत. अर्थ - हिंत, एकता आणि सन्मान. इंग्लंडने स्पर्धेतील अजेय भारतीय टीमला पराभूत करत जोरदार पुनरागमन केले त्यामुळे मॉर्गन व रूटच्या प्रयत्नांना यश आले असे म्हणता येईल.