आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज काल लोक वजन कमी करण्याच्या नादात आहारात विविध बदल करतात. पण केळी खाऊन जर गरम पाणी प्यायले तर वजन कमी करण्यास मदत होते. या आहाराचे नाव मॉर्निंग बनाना ठेवण्यात आले आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की, हे डाएट एवढ्या चांगल्या प्रकारे कसे काम करते, तर आम्ही सांगून देऊ की, असे केल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढून जातो आणि पचनक्रियाही वाढते. केळीत एक प्रकारचा स्टार्च असतो, ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा फारच कमी असते, ज्यामुळे हे पचण्यास जास्त वेळ घेतो आणि बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे ऊर्जादेखील मिळते. जे लोक या आहाराचे पालन करतात त्यांनी रात्री ८ वाजता जेवण करावे व जेवणानंतर गोड खाऊ नये. केळी नेहमी ताजी असायला पाहिजे. 


ब्रेकफास्ट 
1 किंवा जास्त केळी (जोपर्यंत पोट भरत नाही) 
1 ग्लास गरम पाणी 


दुपारचे जेवण 
ताज्या सलाडसोबत भोजन 
भूक लागल्यावर 3 च्या आधी काही गोड खाऊ शकता 


रात्रीचे जेवण 
रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्या खाव्यात. गोड खाणे टाळावे.

 
केळी खाताना गरम पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची समस्या दूर होते. जे लोक असा विचार करतात की सकाळी उपाशीपोटी गार पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, तर असे काही नाही. खरं तर यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम हळू होते आणि वजन कमी होत नाही. 

बातम्या आणखी आहेत...