आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी उठताच या 10 गोष्टी दिसल्यास समजावे लक्ष्मीची तुमच्यावर होणार आहे कृपा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकवेळा व्यक्तीला खूप मेहनत करूनही मनासारखे यश आणि धन प्राप्त होत नाही. परंतु आयुष्यात कधीकधी अचानक असे काही घडते की, ज्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आज आम्ही तुम्हाला असेच काही संकेत सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.


1. घराबाहेर जाताना तुम्हाला एखादी नवविवाहित वधू दिसल्यास हे अत्यंत शुभ मानले जाते. कारण नवीन वधू देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णाचे स्वरूप असते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होणार असल्याचा हा संकेत समजावा.


2. अनेकवेळा आपल्याला सकाळी घराबाहेर पडल्यानंतर झाडू मारणारे स्वच्छता कामगार दिसतात. हे पाहायला भलेही तुम्हाला आवडत नसेल परंतु हा एक शुभ संकेत मानला जातो. मान्यतेनुसार हा देवी लक्ष्मी प्रसन्न होणार असल्याचा संकेत आहे. असे घडल्यास तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते.


3. अचानक तुमच्या घरात घुबड आल्यास हा एक शुभ संकेत समजावा. कारण घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. यामुळे हे घरात आल्याने देवी लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मिळतो.


4. घरातून बाहेर पडताच तुम्हाला एखादा व्यक्ती ऊस घेऊन जाताना किंवा रस्त्यामध्ये ऊसाचे शेत दिसल्यास हा एक शुभ संकेत समजावा. कारण उसाच्या गोडव्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंद येतो.


5. तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर हा शुभ संकेत आहे. मान्यतेनुसार असे घडल्यास मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि घरामध्ये आपुलकीचे वातावरण तयार होते. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते.


6. तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्हाला अचानक उजव्या बाहुला माकड दिसले तर हा शुभ संकेत समजावा. असे घडल्यास व्यक्तीला लवकर धनलाभ होतो असे मानले जाते.


7. तुम्हाला घराबाहेर पडल्यानंतर हिरव्यागार गोष्टी, विशेषतः वृक्ष, रोपटे दिसल्यास लवकर तुमचे आयुष्य आनंदी होणार असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार जवळपास हिरवळ असल्यास आयुष्य संपन्न होते.

बातम्या आणखी आहेत...