सकाळी या वेळेला / सकाळी या वेळेला अंथरून सोडल्यास प्राप्त होऊ शकते सौंदर्य, लक्ष्मी आणि बुद्धी

रिलिजन डेस्क

Nov 08,2018 12:03:00 AM IST

उत्तम स्वास्थ्य आणि देव-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा. ही फार प्राचीन मान्यता आहे. ब्रह्मचा अर्थ परम तत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ. सामान्यतः रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे 4 ते 5.30 पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्त मानला जातो. आपली दिनचर्या सकाळी उठताच सुरु होते. यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, सकाळी लवकर उठल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात.


शास्त्रामध्ये उल्लेख आहे की -
वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥


अर्थ- ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला 1. सुंदरता, 2. लक्ष्मी, 3. बुद्धी, 4. स्वास्थ्य, 5. आयु इ. गोष्टींची प्राप्ती होते. यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते.


पुढे जाणून घ्या, परंपरेशी संबंधित इतर काही खास उपाय...

निरोगी आरोग्याचे रहस्य धर्म ग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायुमंडळामध्ये म्हणजे आपल्या चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन ४१ टक्के, जवळपास ५५ टक्के नायट्रोजन आणि ४ टक्के कार्बनडाय ऑक्साइड वायू राहतो. सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बनडायऑक्साइडचे वाढते. ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे. शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते.यामुळे प्राप्त होते सुख-समृद्धी ब्रह्म मुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी, सुखी, समृद्ध होतो. कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरात कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरुपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. कारण तो जे काम करतो त्यामध्ये त्याची प्रगती होते. विद्यार्थी परीक्षेत यश प्राप्त करतो. जॉब (नोकरी) करणाऱ्या व्यक्तीवर बॉस खुश राहतो. व्यापारी चांगली कमाई करू शकतो. आजारी व्यक्तीचे उत्पन्न तर कमी होते, त्याउलट खर्च वाढू लागतो. यश अशाच व्यक्तीच्या पदरात पडते जे वेळचा सदुपयोग करतात. यामुळे जीवनात स्वस्थ आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठावे.

निरोगी आरोग्याचे रहस्य धर्म ग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायुमंडळामध्ये म्हणजे आपल्या चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन ४१ टक्के, जवळपास ५५ टक्के नायट्रोजन आणि ४ टक्के कार्बनडाय ऑक्साइड वायू राहतो. सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बनडायऑक्साइडचे वाढते. ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे. शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते.

यामुळे प्राप्त होते सुख-समृद्धी ब्रह्म मुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी, सुखी, समृद्ध होतो. कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरात कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरुपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. कारण तो जे काम करतो त्यामध्ये त्याची प्रगती होते. विद्यार्थी परीक्षेत यश प्राप्त करतो. जॉब (नोकरी) करणाऱ्या व्यक्तीवर बॉस खुश राहतो. व्यापारी चांगली कमाई करू शकतो. आजारी व्यक्तीचे उत्पन्न तर कमी होते, त्याउलट खर्च वाढू लागतो. यश अशाच व्यक्तीच्या पदरात पडते जे वेळचा सदुपयोग करतात. यामुळे जीवनात स्वस्थ आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठावे.
X
COMMENT