आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल एन - संयुक्त अरब अमिरातमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. तेथे मोरक्कोच्या एका महिलेने आधी आपल्या प्रियकराची हत्या केली आणि मग त्याच्या बॉडी पार्टसपासून बिर्याणी बनवून ती पाकिस्तानी मजुरांना खाऊ घातली. परंतु यादरम्यान एका छोट्याशा चुकीमुळे महिलेचा पर्दाफाश झाला. पोलिसांना तिच्या घरातून मृत प्रियकराचा दात मिळाल्याने या हत्याकांडाला वाचा फुटली. पोलिस सध्या आरोपी महिलेची कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत.
3 महिने दाबून ठेवले होते प्रकरण...
- संयुक्त अरब अमिरातच्या अल एन शहरात झालेली ही घटना 3 महिन्यांपूर्वीची आहे. परंतु याचा नुकताच खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. तेथे राहणाऱ्या एका मोरक्कन महिलेने बॉयफ्रेंडच्या अप्रामाणिकपणाचा बदला घेण्यासाठी त्याची हत्या केली. तथापि, तिने त्याची नेमकी कशी हत्या केली, हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.
- महिलेने आधी तर आपल्या 7 वर्षे जुन्या प्रियकराची हत्या केली आणि मग आपल्या एका मित्राच्या मदतीने त्याच्या मृतदेहाच्या काही भागाची विल्हेवाट लावली. उर्वरित अवयवांची बिर्याणी बनवून ती पाकिस्तानी मजुरांना खाऊ घातली.
- मृत तरुणाचा भाऊ भावाचा शोध घेत तेथे पोहोचल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला. ती महिला मृताबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही, यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
दात सापडल्याने अडकली महिला
- पोलिसांनी जेव्हा महिलेच्या घरी छापा टाकला तेव्हा तपासणीमध्ये तेथे ठेवलेल्या मिक्सरमध्ये मृत प्रियकराचा एक दात आढळला. पोलिसांनी त्याची DNA टेस्ट केल्यावर तो मृत तरुणाच्या डीएनएशी जुळला. यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली.
- महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा प्रियकर तिला धोका देऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न करणार होता. यामुळे चिडून तिने त्याची हत्या केली. महिला म्हणाली की, खूप चिडल्यामुळे तिच्या हातून हे कृत्य घडले.
- आरोपी महिलेचे म्हणणे आहे की, आम्ही मागच्या 7 वर्षांपासून एकत्र राहत होतो. इतक्या वर्षांपासून तीच त्याचा खर्च भागवत होती. परंतु एवढे सगळे होऊनही जेव्हा त्याने तिला धोका दिला, तेव्हा बदला घेण्यासाठी मी हे पाऊल उचलले. सध्या महिलेविरुद्ध खटला सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.