आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री अनंत कुमार पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थिवावर मंगळवारी बंगळुरू येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अनंत कुमार यांचे निधन सोमवारी सकाळी 2 वाजता बंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात झाले. मृत्युसमयी ते 59 वर्षाचे होते. काही महिन्यांपासून ते फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. ऑक्टोबरमध्ये ते न्युयॉर्कमधून उपचार घेउन परतले होते. परंतु पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना बंगळरु येथील रूग्णालयात भर्ती करण्यात आले होते. तेथे त्यांनी सकाळी 2 वाजता अखेरचा श्वास घेतला.

 

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. तेजस्विनी, ऐश्वर्या व विजेता या दोन मुली आहेत. खत व रसायन मंत्री म्हणून युरियाला लिंबाचा कोट व जन औषधी केंद्रांची त्यांनी सुरुवात केली होती. अनंतकुमार सुरुवातीला संघाशी जोडले गेले. महाविद्यालयीन जीवनात अभाविपत प्रवेश करत १९८७ मध्ये भाजपत दाखल झाले. १९९६ पासून बंगळुरूतील दक्षिण लोकसभा जागेवरून ते सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले. 

 

- अनंत कुमार यांच्या अंत्य संस्कारात उपराष्ट्रपति एम वेंकैया नायडू, भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, रक्षा मंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, रविशंकर प्रसाद, संघ नेते सुरेश भैयाजी जोशी, कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सहीत अनेक नेते आले होते. 

 

अनंत कुमार यांच्याकडे होता दोन पदांचा भार  
मोदी सरकारमध्ये कुमार यांच्याकडे 2014 पासून रसायन  मंत्री हे पद होते. त्याशिवाय त्यांना जुलै 2016 मध्ये संसदीय प्रकरणांची जबाबदारी देण्यात आली होती. अनंत कुमार वाजपेयी सरकारमध्ये मार्च 1998 ते ऑक्टोबर 1999 पर्यंत नागरि उड्डान मंत्री होते. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 ला बंगळुरूमध्ये झाला होता. त्यांनी केएस आर्ट कॉलेज हुबळी येथून बीएची पदवी घेतली होती. त्यानंतर जेएसएस लॉ कॉलेजमधून एलएलबी केली. 

बातम्या आणखी आहेत...