आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी झोपेतून उठताच करावे हे एक काम, दूर होऊ शकतात सर्व अडचणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कूर्म पुराणामध्ये हिंदू धर्मच्या विविध प्रथा-परंपरांची आणि शुभफळ प्रदान करणाऱ्या कामांविषयी सांगण्यात आले आहे. या प्रथांचे पालन केल्यास व्यक्ती आपल्या वाईट काळ आणि अडचणींमधून मुक्त होतो.... कूर्म पुराणामध्ये हिंदू धर्मच्या विविध प्रथा-परंपरांची आणि शुभफळ प्रदान करणाऱ्या कामांविषयी सांगण्यात आले आहे. या प्रथांचे पालन केल्यास व्यक्ती आपल्या वाईट काळ आणि अडचणींमधून मुक्त होतो. यासोबतच त्याला भाग्याची मदत मिळते. कूर्म पुराणामध्ये 39 व्या अध्यायामध्ये चार नावांचे वर्णन करण्यात आले आहे. या नावांचा जप करणे शुभ राहते. योग्य दिशेकडे मुख करून या चार नावांचे स्मरण केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो.


श्लोक 
मानसोपरि माहेन्द्री प्राच्यां दिशि महापुरी।
दक्षिणेन यमस्याथ वरुणस्य तु पश्च
िमे।।

- मानसाचलच्या पूर्व दिशेला इंद्रदेवाचे नगर आहे. रोज सकाळी उठताच पूर्व दिशेला मुख करून इंद्रदेवाचे नामस्मरण करून स्तुती करणे शुभ राहते.

- दक्षिण दिशेला यमदेवाचा वास आहे. यामुळे दक्षिण दिशेला मुख करून यमदेवाचे नाव घेऊन त्यांची स्तुती करणे चांगले राहते.

- पश्चिम दिशेला वरुण देवाचा वास मानला जातो. रोज सकाळी उठून पश्चिम दिशेला मुख करून वरुण देवाचे नाव घेणे आणि स्तुती करणे शुभ राहते.

- उत्तर दिशेला सोम म्हणजे चंद्रदेवाचा वास आहे. रोज सकाळी उत्तर दिशेकडे मुख करून चंद्रदेवाचे नाव घेणे आणि स्तुती करणे शुभ फलदायक राहते.