आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo च्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचा अखेर राजीनामा, म्हणाले-न्यायालयीन लढाई लढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकापाठोपाठ झालेल्या #MeToo च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अकबर यांनी संपादक पदी असताना लैंगिक शोषण केल्याचे आरोप काही महिला पत्रकारांनी केले होते. त्यावर केंद्र सरकारसह अकबर यांनीही मौन बाळगले होते. मात्र बुधवारी अखेर अकबर यांनी राजीनामा दिला असून, कोर्टात न्यायाची लढाई लढणार असल्याचे म्हटले आहे. 


अकबर यांचे निवेदन 
एम.जे.अकबर यांनी बुधवारी एख निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी लिहिले की, मी आता या मुद्द्यावर कोर्टातून न्याय मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वैयक्तिक पातळीवर मी हा लढा देणार असल्याने पायउतार होणेच मला योग्य वाटत आहे. माझ्या विरोधात लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांना कोर्टात आव्हान देणार असल्याचेही अकबर यांनी म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...