आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळातील एकाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीत सोमवारी जनता दरबार भरला होता आणि मुख्यमंत्री आपल्या राज्यातील विविध समुदाय आणि संस्थांसह लोकांच्या समस्य ऐकूण घेत होते. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंचे एक शिष्टमंडळ वक्फ बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याची मागणी घेऊन आले होते. मोहम्मद इमरान (39) असे या मौलानाचे नाव असून त्याच्या बॅगेत जिवंत काडतूस सापडले. त्यामुळेच, त्याला अटक करून सध्या कसून चौकशी केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अरविंद केजरीवाल यांच्या मिरचीपूड हल्ला करण्याचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच ही नवीन घटना घडली आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय म्हणाला आरोपी..?
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी बातचीत करण्यासाठी पुढे आलेल्या शिष्टमंडळाची तेथील गार्ड तपासणी करत होते. त्याचवेळी इमरानच्या बॅगेत जीवंत काडतूस सापडले. इमरान बावली वाली या मशीदीचा केअरटेकर आहे. त्याला आर्म्स अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आरोपी इमरान म्हणाला, ही बुलेट मशीदीच्या डोनेशन बॉक्समध्ये मिळाली होती. यानंतर ती आपल्या पर्समध्ये ठेवली. परंतु, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी ती काढण्यास आपण विसरून गेलो. सुरुवातीला ही बुलेट यमुना नदीत फेकून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ऐनवेळी काही तरी वेगळे वाटल्याने आपल्या पर्समध्ये ठेवले असा दावा इमरानने केला.
मिरची हल्ल्यासाठी गृहमंत्री जबाबदार -केजरीवाल
गेल्या आठवड्यात गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच भाजप आणि आप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या देखील सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या मिरची हल्ल्यावरून दिल्ली विधानसभेचे आपातकालीन अधिवेशन बोलावण्यात आले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावर झालेल्या मिरची हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जबाबदार धरले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.