आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mosques And Shaheen Baugh Activist Will Be Removed If Bjp Comes To Power In Delhi, Claims Bjp Mp Varma

दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास सरकारी जागांवरील मशीदी हटवू, भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप खासदार प्रवेश वर्माचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास सरकारी जमिनींवरील सर्व मशीदी हटवल्या जातील. तसेच शाहीन बाग येथे सुरू अससेले आंदोलन तासाभरात संपवून टाकू. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरुद्ध 15 डिसेंबरपासून शाहीन बाग येथे आंदोलन सुरू आहेत.

भाजपची सत्ता आल्याच्या एका महिन्याच्या आत मशीदी हटवणार...

विकासपुरी विधानसभा मतदार संघात भाजपचा प्रचार करताना प्रवेश वर्मा म्हणाले, "11 फेब्रुवारीला जर दिल्लीत भाजपची सत्ता आली, तर शाहीन बागमध्ये एकही आंदोलक दिसणार नाही. भाजपचे सरकार बनल्याच्या एका महिन्याच्या आत मी माझ्या लोकसभा क्षेत्रातून सरकारी जमिनीवरील सर्व मशीदी हटवणार आहे."

शाहीन बागचे आंदोलक तुमच्या घरात घुसून रेप करतील -भाजप नेता

शाहीन बाग येथील आंदोलकांवर टीका करताना या भाजप खासदाराची जीभ आणखी खालच्या थराला घसरली. "शाहीन बागचे आंदोलक आज दिल्लीच्या एका कोपऱ्यात बसून गोंधळ घालत आहेत. काश्मीरात काश्मिरी पंडितांच्या आया-बहिणींवर बलात्कार करण्यात आले. त्यांना राज्यातून हकलून लावण्यात आले. असेच प्रकार इतर राज्यांमध्ये देखील घडले आहेत. शाहीन बागचे आंदोलक सुद्धा असेच आहेत. ते आता तुमच्या घरात घुसून तुमच्या आया-बहिणींवर रेप करतील. तुम्हाला मारून टाकतील. दिल्लीकरांनो हीच वेळ आहे जागे व्हा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. यासाठी दिल्लीच्या जनतेला जागे व्हावेच लागेल." असे भाषण या भाजप खासदाराने केले आहे.