आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - चीनच्या सोशल मीडियावर सध्या ही 19 वर्षांची तरुणी प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात ती एक क्रिमिनल गँगची सदस्य आहे. पोलिसांनी वॉन्टेडच्या यादीत तिला सामिल करून स्थानिक पोलिस स्टेशन आणि वेबसाइटवर तिचा फोटो जारी केला. परंतु, बहुतांश लोकांचे लक्ष तिच्या फोटोखाली दिलेल्या नोटीसवर गेलेच नाही. चिनी सोशल मीडिया वीबोवर लोकांनी तिचे फोटो शेअर केले. काहींनी तर असेही म्हटले की तिने काहीही केले असू द्या. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. तर काहींनी तर तिला माफ करून सोडून द्यावे अशी विनंती पोलिसांना केली आहे. लोकांनी अवघ्या काही तासांत तिचा फोटो इतका फिरवला की ती एक सेलिब्रिटी बनली आहे.
काय आहे तिचा गुन्हा?
>> आपल्या डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या या तरुणीचे नाव किंगचेन जिंगजिंग असे आहे. ती सध्या एका महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे. परंतु, शिक्षण घेत असतानाच ती एका गुन्हेगारी टोळीची सदस्य बनली. 7 जणांच्या तिच्या या टोळीने आतापर्यंत कित्येक लोकांना लाखोंचा चुना लावला आहे. तिच्या टोळीतील सदस्यांमध्ये प्रामुख्याने अशाच तरुणींचा समावेश आहे. बार किंवा रेस्त्राँ त्यांचे अड्डे आहेत.
>> याच ठिकाणी ते सर्वात दारुड्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर नजर ठेवतात. सुंदर तरुणी त्यांच्या बाजूला जाऊन बसतात आणि हळूच पैसे घेऊन पसार होतात. एका व्यक्तीला बारमध्ये भेटल्यानंतर जिंगजिंगने त्याला हजारोंचा गंडा घातला. त्यानेच सर्वप्रथम तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. सविस्तर चौकशी आणि सीसीटीव्ही व्हिडिओतून ती एका टोळीत काम करत असल्याचा खुलासा झाला.
>> पोलिसांनी जिंगजिंगच्या टोळीतील 3 सदस्यांना अटक केली. त्यांच्याच चौकशीतून जिंगजिंगची संपूर्ण माहिती समोर आली. टोळीच्या सदस्यांकडूनच तिचे फोटो घेऊन पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले. परंतु, लोकांना आता तिच्यावर दया येत आहे. तिच्या एका मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे, शाळेत असताना कित्येक मुले तिच्या मागे होते. ती अतिशय गर्विष्ठ मुलगी होती. सोशल मीडियावर अनेकांनी तिला अटक करू नये अशी विनंती केली आहे. तर, एकाने सुंदर असणे गुन्हा नाही. परंतु, सौंदर्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटणे गुन्हा असून तिला अटक व्हायलाच हवी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.