आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एका मॅगझिनने प्रकाशित केले होते वृत्त - \'दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन शाहरुख अभिनेत्रीसोबत रात्र घालवायला तयार\', या कारणामुळे झाली होती शाहरुखला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः येत्या 2 नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान वयाची 53 वर्षे पूर्ण करणार असून तो बॉलिवूडमधील मळमिळाऊ अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो सगळ्यांशी मोकळ्या मनाने भटतो. मग ते चाहते असो वा मीडियाचे लोक. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख एका आर्टिकलने एवढा नाराज झाला होता की, त्याने पत्रकाराला शिवीगाळ केली होती, इतकेच नाही तर त्याच्यावर हातही उगारला होता. यासाठी त्याला अटकदेखील झाली होती.

 

एका मॅगझिनने प्रकाशित केले होते वृत्त - 'दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन शाहरुख अभिनेत्रीसोबत रात्र घालवायला तयार'... 
ही सप्टेंबर 1992 ची गोष्ट आहे. त्यावेळी शाहरुख दिग्दर्शक केतन मेहतांच्या 'माया मेमसाब' (1993) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. यात शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपा साही यांच्यात एक इंटीमेट सीन होता.  


याचकाळात मुंबई बेस्ड ग्लॅमर मॅगझिन सिनेब्लिट्जने वृत्त प्रकाशित केले होते की, या सीनच्या शूटिंगपूर्वी दिग्दर्शक केतन मेहतांनी अभिनेत्री दीपा साहीसोबत शाहरुखला मुंबईतील एका हॉटेलमध्ये रात्र घालवायला सांगितली होती. जेणेकरुन दोघेही इंटीमेट सीन देताना कम्फर्टेबल असतील. विशेष म्हणजे दीपा साही केतन मेहतांची पत्नी आहे. मॅगझिनमध्ये हेदेखील प्रकाशित झाले होते की, शाहरुख आणि दीपा दिग्दर्शकाची डिमांड पूर्ण करायला तयार झाले होते. दुस-या दिवशी फक्त दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरच्या उपस्थितीत सीनचे शूटिंग पूर्ण झाले. हा शाहरुखच्या करिअरमधील सर्वाधिक वादग्रस्त सीन असल्याचे म्हटले जाते. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रांच्या 'किंग ऑफ बॉलिवूड : शाहरुख खान अँड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. 

 

शाहरुखने केली होती शिवीगाळ... 
- जेव्हा शाहरुखने दीपा आणि त्याच्याविषयीचे हे वृत्त वाचले तेव्हा त्याचा पारा चांगलाच चढला. एका इव्हेंटमध्ये शाहरुखने सिनेब्लिट्जचे पत्रकार कीथ डी-कोस्टा यांच्यावर हल्ला केला.  ज्याने आर्टिकल छापले ती व्यक्ती कीथ असल्याचा समज शाहरुखचा झाला होता. असे म्हटले जाते की, शाहरुखने कीथ यांना शिवीगाळ केली होती. इतकेच नाही तर अनेकदा कीथ यांना कॉल करुन घरातून शिरुन मारण्याची धमकीही दिली होती. एकेदिवशी शाहरुख कीथच्या घरी पोहोचला आणि त्यांच्या आईवडिलांसमोरच त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. शाहरुखने कीथ यांना नपुंसक बनवण्याची धमकी दिली होती.

 

घाबरुन पत्रकाराने केली होती पोलिसांत तक्रार...  

- शाहरुखच्या वागण्यामुळे कीथ घाबरले होते. शाहरुख कधीही आपल्याला नुकसान पोहोचवू शकतो, असे त्यांना वाटत होते. मॅगझिनच्या एडिटरच्या सल्ल्यानंतर कीथन यांनी शाहरुखविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण तरीही शाहरुखचे धमकी देणे बंद झाले नव्हते. कीथ यांनी पोलिसांकडे पोलिस सुरक्षाची मागणी केली होती. त्यानंतर शाहरुखला फिल्मसिटीतून अटक करुन वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. पण शाहरुखला तुरुंगवास झाला नाही. त्याकाळात शाहरुख स्टार झाला होता. काही पोलिस त्याचा ऑटोग्राफरही घेत होते. शाहरुखने पोलिसांकडे फोन कॉलची रिक्वेस्ट केली आणि पोलिसांनी त्याची विनंती मान्य केली. शाहरुखने तेथूनच कीन यांना फोन केला आणि म्हटले  - "आता मी पोलिस स्टेशनमध्ये आहे, पण तुला मारायला नक्की येईल." कथितरित्या शाहरुखने कीथ यांना पोलिसांसमोरच धमकी दिली होती.

 

रात्री 11 वाजता एका जवळच्या मित्राने केला होता शाहरुखचा जामिन... 

- रात्री साडे अकराच्या सुमारास शाहरुखचा जवळचा मित्र चिक्की पांडे (चंकी पांडेचा भाऊ) ने शाहरुखची जामिनावर सुटका केली होती. दोन वर्षांनी  सिने ब्लिट्जच्या एका दुस-या पत्रकाराने शाहरुखला सांगितले होते की, दीपा आणि त्याच्याविषयीचे आर्टिकल कीथ यांनी लिहिले नव्हते. तेव्हा शाहरुखला त्याच्या चुकीची जाणिव झाली. त्याने कीथची माफी मागितली. शाहरुखने कीथ यांच्या आईवडिलांचीही माफी मागितली होती. त्यानंतर शाहरुखने सिनेब्लिट्जसाठी एक एक्सक्लुझिव्ह फोटोशूट केले आणि इंटरव्यूही दिला. पण ते आर्टिकल कुणी लिहिले होते, याचा खुलासा अनुपमा चोप्रा  यांच्या पुस्तकात करण्यात आलेला नाही. 


सेन्सॉर बोर्डाने सीन बघून घेतला होता निर्णय... 
- 2 जुलै 1993 रोजी रिलीज झालेल्या माया मेमसाब या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपा साही यांच्याशिवाय फारुख शेख, राज बब्बर आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायनल कटवेळी सेन्सॉर बोर्डाने शाहरुख आणि दीपा यांच्यात चित्रीत झालेला वादग्रस्त इंटीमेट सीन चित्रपटातून वगळला होता. हा सीन 2008 मध्ये ऑनलाइन लीक झाला आणि चर्चेचा विषय बनला होता. 

बातम्या आणखी आहेत...