Home | Khabrein Jara Hat Ke | most dangerous alnwick poison garden

या सुंदर बागेत फिरणे तर दूरच, नाव घेताच घाबरतात लोक, येथे जाणारा परत येत नाही 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:30 PM IST

बागेच्या दाराबाहेर 24 तास सुरक्षारक्षक तैनात असतात. 

 • most dangerous alnwick poison garden

  लोकांना नेहमीच मॉर्निंग वॉकसाठी एखाद्या हिरव्या गार झाडं असलेल्या गार्डनमध्ये जायला आवडते. पण जर तुम्हाला एखाद्या गार्डनमध्ये जाण्यास सांगितले, जेथे गेल्यावर मनुष्याचा मृत्यू होतो तर, तर नक्कीत तुम्ही नकार द्याल. असाच एक बगीचा आहे. येथे लोक फिरण्यासाठी जायला खुप घाबरतात. यामुळे या बागेत जाताना लोकांना गार्डसोबत जाण्याचा सल्ला दिला होता. जर चुकूनही कुणी या बागेत गेले, तर तो परत येऊ शकत नाही.

  - ही बाग यूनायडेट किंगडमच्या नॉथंबरलँडमध्ये आहे. या बागेचे नाव अलन्विक पाइजन गार्डन्स आहे. या गार्डनला जगातील सर्वात भितीदायक गार्डन मानले जाते. अलन्विक गार्डन उत्तर इग्लंडमधील सर्वात सुंदर आकर्षणांपैकी आहे. येथील रंगी-बेरिंगी झुडूपे, सुंगंधी गुलाब, मेनीक्योर केलेले टॉपियर आणि केस्केडिंग फाउंटेन लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.


  - पण हे गार्डन अलन्विक गार्डनच्या सीमांमध्ये आहे, येथील काळ्या लोखंडाच्या दारावर स्पष्ट लिहिले आहे की, फूलांचा थांबून वास घेणे आणि त्यांना स्पर्श करण्यास मनाई आहे. आता ही बाग विषारी गार्डन म्हणून प्रसिध्द झाली आहे. ही बाग 100 कुख्यात हत्या-यांचे घर आहे. जर या बागेत गेल्यानंतर थोडीजरी चूक झाली तर तुमचा मृत्यू होऊ शकतो असे मानले जाते.


  - बागेत प्रवेश करण्यापुर्वीच मुख्य प्रवेश द्वारावर चेतावनी म्हणून धोक्याचे निशान बनवण्यात आले आहे. ही बाग जवळपास 14 एकर क्षेत्रात पसरली आहे. या बागेत जवळपास 700 विषारी झाडं आहेत. फिरताना गाइड या झाडांच्या विषारी गुणांविषयी सांगतो. या विषारी रोपट्यांचा वापर शाही शत्रूंना हरवण्यासाठी केला जात होता. यामुळे या बागेच्या दाराबाहेर 24 तास सुरक्षारक्षक तैनात असतात.

 • most dangerous alnwick poison garden
 • most dangerous alnwick poison garden
 • most dangerous alnwick poison garden
 • most dangerous alnwick poison garden

Trending