आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात महागडे लग्न: कुणी जेनिफर लोपेजचा नाचवले, तर कुणी केली 552 कोटींची उधळपट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - व्यावसायिक घराण्यांत लग्नात होणारा अवाढव्य खर्च ही सामान्य बाब आहे. अशा लग्नांच्या तयारीला जवळपास वर्षभरापूर्वी तयारी सुरू केली जाते. फाइव्ह स्टार हॉटेल आणि महागडया राजवाडयांच्या बुकिंगपासून ते हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या कलाकारांवरही मुबलक पैसा खर्च केला जातो. असेच काही लग्न त्यांची महागडी थाटबाट आणि तितक्याच महागडया खाद्यपदार्थांच्या मेजवानीसाठी प्रसिद्ध आहेत. सुब्रतो रॉय यांच्या मुलीचे लग्न, लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी वार्निश मित्तलचे लग्न आणि जी.व्ही.के. ग्रुपच्या जी.व्ही. रेड्डी यांच्या नातीचे लग्न सर्वात प्रसिद्ध आहेत. तर ब्रिटनमध्ये सर्वात धनाढ्य भारतीय कुटुंब हिंदुजा फॅमिलीच्या एका लग्नामध्ये अभिनेत्री जेनिफर लोपेज हिला परफॉर्म करण्यासाठी बोलावण्यात आले होते. आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच काही महागडया लग्नांविषयी माहिती देत आहोत. 

 

हिंदुजा घराण्यातील विवाह...
2015 मध्ये लंडनचे अरबपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजा यांचे लग्न झाले. 50 वर्षीय संजय हिंदुजा यांनी गर्लफ्रेंड अनु मेहतानीसोबत लग्न केले. हे लग्न उदयपूरच्या एक्सक्ल्युजिव्ह हॉटेल जगमंदिर आईसलँड पॅलेस मध्ये झाले होते आणि या लग्नसाठी तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नामध्ये जेनिफर लोपेज आणि निकोल शरजिंगर या दोघांनी परफॉर्म केले होते. 


- जेनिफर लोपेजने त्यावेळी परफॉर्म करण्यासाठी 6.5 कोटी रुपये घेतले होते. 
- लग्नात आलेल्या 16000 पाहुण्यांसाठी जवळपास 16 देशांच्या वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी होती. 
- 208 चार्टर्ड प्लेन उदयपूरच्या खाजगी विमानतळावर उतरले होते. 
- मुंबईहून पाहुण्यांसाठी बीएमडब्ल्यू मागवण्यात आली होती.
- नवरदेवाचा सूट मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता.  

 

इतर लग्नांविषयी जाणून घेण्यासाठी वाचा पुढील स्लाईड...

बातम्या आणखी आहेत...