आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह पाळणे ही पाकिस्तानात श्रीमंतांची निशानी आहे, 300 पेक्षा जास्त सिंह आहेत पाळीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- बिलाल मंसूर ख्वाजा खूप जेव्हा आपल्या कराचीमधल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या हजारो मौल्यवान जनावरांपैकी एका पांढऱ्या रंगाच्या सिंहाच्या अंगावरून हात फिरवतात, तेव्हा ते खूप खूश दिसतात. श्रीमंतांच्या या खासगी प्राणी संग्रहालय बनवने आणि परदेशातील जनावरे पाळण्याच्या या आवडीमुळे पाकिस्तानातील कराचीत हा जनावरांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. 29 वर्षीय उद्योगपती ख्वाजा बिलाल मंसूर सेठी साखळीत बांधलेल्या आपल्या सिंहाविषयी सांगतात की, "हा एक दुर्मिळ प्राणी आहे, ज्यांचा मालक मी आहे..."

 

पाकिस्तानातील कायद्यामुळे परदेशी जनावरांची आयात करणे सोपे आहे, पण एकदा ही जनावरे देशात आल्यावर त्यांच्याबद्दल असलेले कायदे दिसतच नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे श्रीमंत लोक यांची आयात करून त्यांना अवैधरित्या विकतात, यावर वन अधिकारी फक्त पाहत राहतात. सोशल मीडिया अशाप्रकारच्या व्हिडिओजनी भरलेला आहे, ज्यात कराचीतील श्रीमंतांच्या SUV च्या पुढील सीटवर सिंह बसलेला दिसतो. 


ख्वाजा बिलाल मंसूर सेठीचा अंदाज आहे की, 2 कोटी लोकसंख्या असलेल्या कराचीमध्ये अंदाजे 300 सिंह आहेत. ज्यांना या गजबजलेल्या शहरातील अनेक घरात, पिंजऱ्यात ठेवले जाते.


या काही वर्षात जमा केलेल्या 4,000 पेक्षा जास्ती जनावरांच्या कलेक्शनमध्ये ख्वाजा आपल्या काही सिंह आणि वाघांना 'क्राउन ज्वेल' नावाने हात मारतात. 800 पेक्षा जास्त जनावरांचे कलेक्शन ठेवणाऱ्या ख्वाजा यांनी सांगितले की, हा प्राणी संग्रहालय स्टेटस किंवा प्रतिष्ठेसाठी नाही बांधला तर, जनावरांबद्दल आपूलकी आणि प्रेमामुळे उभारला आहे. नऊ एकरात बनलेल्या या प्राणी संग्रहालयात झेब्रा, फ्लेमिन्गो घोडे आणि बरेच प्राणी आहेत. ख्वाजा यांनी त्यांच्या देखरेखीसाठी 30 पेक्षा जास्त लोक लावले आहेत आणि त्यांच्याशिवाय चौर जनावरांचे डॉक्टरदेखील आहेत.