आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाेपाळ - लोकांचा सर्वाधिक विश्वास असणाऱ्या तसेच ज्यांना देशाची सत्ता दिली जाते, अशा देशातील २ सर्वात मोठ्या राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. ५ राज्यांतील निवडणुकीत भाजप व काँग्रेसचे नेते काँग्रेसचे नेते अपशब्द वापरत आहेत. बहुतांश नेते मोदी व राहुलविरुद्ध बोलत आहेत.
काँग्रेस नेते या निवडणुकीत मोदींना ‘चोर’ संबोधत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे नाव दिले आहे. १७ नोव्हेंबरला छत्तीसगडच्या कोरियातील सभेत राहुल म्हणाले, तुमच्या पैशाची चोरी करणाऱ्याचे नाव मोदी आहे. यावर मोदी रविवारी म्हणाले, हिंदी, इंग्रजीच्या शब्दकोशात जेवढ्या काही शिव्या आहेत, काँग्रेसचे नेते मोदी यांना त्या देण्यात गुंतले आहेत.
> भाजप काँग्रेस : दोघेही शिरजोर
मोदी, मनमोहनसिंग यांना रात्रीचा चौकीदार संबोधले
२००४ मध्ये अडवाणी यांच्या भारत उदय यात्रेत मोदी यांनी सोनिया गांधींना जर्सी गाय व राहुल गांधींना हायब्रीड वासरू संबोधले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. मोदींनी २०१२ मध्ये एका सभेत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांना पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हटले. २०१४ निवडणुकीआधी मनमोहन सिंग यांना रात्रीचा चौकीदार म्हटले.
विजयवर्गीय यांनी राहुलना रावण संबोधले : रविवारी खंडवात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी राहुल यांच्या मंदिर प्रवेशावर रावणासारखी प्रवृत्ती ठरवली. भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणाले, रफाल वाद राहुल यांच्या मंदबुद्धीची विषारी निर्मिती आहे.
२०१३ मध्ये अमित शहांनी राहुल यांना पप्पू म्हटले
मोदींना ११ वर्षांपासून व राहुल यांना १४ वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत एक नवीन नाव मिळते. मोदींना सोनिया गांधींनी २००७ निवडणुकीत ‘मौत का सौदागर’ म्हटले होते.
पप्पूवर राजकारण : राहुल गांधींनी २००७ मध्ये दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीला संबोधित केले होते. यानंतर राहुल यांनी काँग्रेसमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते. २००७ मध्ये पप्पू पास हो गया चित्रपट आला होता. २००८ मध्ये पप्पू कांट डान्स साला गाणे आले. यामुळे पप्पू शब्द खूप चर्चेत आला. २०१३ मध्ये राहुल यांनी सीआयआय बैठकीला संबोधित केले. या दिवशी टि्वटरवर हॅशटॅग पप्पूसीआयआय ट्रेंड झाला. २०१३ मध्ये शहा यांनी राहुल यांना पप्पू संबोधल्याचे मानले जाते.
वर्ष | निवडणूक | अपशब्द | नेते |
---|---|---|---|
2007 | गुजरात | ‘मौत का सौदागर’ | सोनिया गांधी |
2009 | लोकसभा | बदतमीज | रिझवान उस्मानी |
2009 | लोकसभा | नालीतला किडा | बी.के. हरिप्रसाद |
2012 | गुजरात | बंदर | अर्जुन मोढवाडिया |
2012 | गुजरात | घांची | सोमा पटेल |
2013 | पीएमपद | गंगू तेली | गुलाम नबी आझाद |
2013 | पीएमपद | भस्मासुर | जयराम रमेश |
2013 | पीएमपद | रावण | दिग्विजय सिंह |
2014 | लोकसभा | नपुंसक | सलमान खुर्शीद |
2014 | लोकसभा | पागल | अर्जुन मोढवाडिया |
2017 | यूपी | भक्तांचा चू... | दिग्विजय सिंह |
2017 | यूपी | रक्ताची दलाली | राहुल गांधी |
2017 | गुजरात | नीच | मणिशंकर अय्यर |
2018 | कर्नाटक | गब्बर सिंह | राहुल गांधी |
2018 | छत्तीसगड | चोर | राहुल गांधी |
- मोदींना काँग्रेस नेत्यांनी साप, विंचू, लहू पुरुष, पागल, कुत्रा, औरंगजेब, मानसिक रुग्ण, दाऊद इब्राहिम, अशिक्षित, यमराज नावाने संबोधले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.