आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेत १८ वर्षांनंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वाधिक काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. हे अधिवेश १८ जुलै रोजी सुरू झाले होते. २४ दिवसांचे हे अधिवेशन कामकाजाच्या दृष्टीने सन २००० नंतर सर्वाधिक कामकाजाचे पावसाळी अधिवेशन ठरले. या दरम्यान संसदेत २१ विधेयक मांडण्यात आले. त्यापैकी दोन सभागृहात १२ पारीत झाले. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत ११० टक्के कामकाजाचे फलीत निघाले तर राज्यसभेत कामकाजातून ६६ टक्के एवढी निष्पत्ती निघाली. 
 
लोकसभेचा ५० टक्के तर राज्यसभेचा ४८ टक्के वेळ मात्र केवळ कायद्यासंबंधीच्या कामकाजात गेला. १६ व्या लोकसभेत दोन्ही सभागृहांचे कामकाज २००४ नंतर दुसऱ्या स्थानी राहिले. यंदा केवळ २६ टक्के विधेयके संसदीय समित्यांकडे पाठवण्यात आले. पावसाळी अधिवेशनात एससीएसटी कायदा व परदेश पलायन प्रतिबंधक कायद्यासंबंधी दुरूस्तीच्या विधेयकांना मंजुरी मिळाली. गत अनेक अधिवेशनांच्या तुलनेत हे अधिवेशन कामकाजाच्या दृष्टीने फलनिष्पत्ती देणारे व समाधानकारक झाल्याचे लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
 
गत ७ पैकी सर्वाधिक उत्पादक ठरलेले अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१८ मध्ये लोकसभेची उत्पादकता केवळ २१ टक्के व राज्यसभेची ३१ टक्के होती. लोकसभा ३३.६ तास व राज्यसभा ५३.२ तास कामकाज चालले होते. हिवाळी अधिवेशन २०१७ मध्ये लोकसभेची उत्पादकता ७८ टक्के व राज्यसभेची ५४ टक्के होती. पावसाळी अधिवेशन २०१७ मध्ये लोकसभेची उत्पादकता ६७ टक्के तर राज्यसभेची ७२ टक्के होती. २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेची उत्पादकता १०८ टक्के व राज्यसभेची ८६ टक्के होती. २०१६ मध्ये हिवाळी अधिवेशनाची उत्पादकता १६ टक्के व राज्यसभेची १८ टक्के होती. पावसाळी अधिवेशन-२०१६ मध्ये लोकसभेची उत्पादकता १०१ टक्के व राज्यसभेची ९६ टक्के होती. २०१६ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाची उत्पादकता आतापर्यंतची सर्वाधिक १२१ टक्के व राज्यसभेची ९१ टक्के होती.
 
 
पावसाळी अधिवेशन-२०१८ मध्ये प्रश्नोत्तराची उत्पादकता
 
लोकसभा : 
- उत्पादकता -  ८४%
- कार्यवाही -१४.३ तास
> अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१८ मध्ये लोकसभेत प्रश्नाेत्तराची उत्पादकता केवळ ११ टक्के राहिली होती व ३.१ तास एकूण कामकाज चालले होते.
 
राज्यसभा :
- उत्पादकता - ६८%  
- कामकाज - ११.५ तांस
> अर्थसंकल्पीय अधिवेशन-२०१८ मध्ये राज्यसभेत प्रश्नोत्तराची उत्पादकता केवळ ०.७ टक्के होती आणि २ तास एकूण कामकाज चालले होते.

बातम्या आणखी आहेत...