Home | Khabrein Jara Hat Ke | Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths

Alert: जगातील सर्वात विषारी मासा, दिसताक्षणी पळा; एक थेंब विष करू शकतो अख्ख्या शहराचा नरसंहार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:06 AM IST

वेळीच उपचार झाल्यास माणूस जिवंतही वाचू शकतो. परंतु, ज्या भागाला त्याचा स्पर्श झाला शरीराचा तो अंग कापावा लागतो.

 • Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths

  न्यूयॉर्क - जगभरात असे अनेक जीव आहेत, ज्यांची लोकांना माहितीच नाही. त्यापैकी काही इतके घातक आहेत की छोटीशी चूक आपला जीव घेऊ शकते. त्यातच एक असाही घातक जीव आहे जो नरसंहार घडवू शकतो. 'स्टोन फिश' असे त्याचे नाव असून अनेकदा लोक त्यास दगड समजण्याची चूक करतात. चुकून त्याला स्पर्शही करणाऱ्याचा मृत्यू होतो. त्यामुळे, काही समुद्र किनारी अशा जीवांचे फोटो लावून लोकांना सावध केले जाते. अशा प्रकारचा जीव किनारपट्टीवर आढळल्यास पाहताक्षणी पसार व्हा असा इशारा दिला जातो.


  जगातील सर्वात विषारी मासा...
  जगातील सर्वात विषारी मासा अर्थात स्टोन फिश मकरवृत्तामध्ये समुद्र किनारी सापडतो. दगडासारखा दिसणारा हा मासा अनेकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे. लोकांना त्याची माहितीच नसल्याने त्याला दगड समजून स्पर्श करतात. किंवा नकळत त्यावर पाय पडतो आणि जागीच मृत्यू होतो. स्पर्श होताच यातील न्यूरोटॉक्सीन विष बाहेर पडतो आणि थेट रक्तात प्रवेश करतो. वेळीच उपचार झाल्यास माणूस जिवंतही वाचू शकतो. परंतु, ज्या भागाला त्याचा स्पर्श झाला शरीराचा तो अंग कापावा लागतो.


  एक थेंब विष करू शकतो शहराचा नरसंहार
  स्टोन फिशच्या शरीराला स्पर्श होताच त्यातील विष अवघ्या 0.5 सेकंदात विष सोडतात. अर्थात पाय पडताच विष शरीरात प्रवेश करून आपले काम सुरू करते. या मासाचे विष इतके घातक आहे की एखाद्या शहराच्या पाण्यात एक थेंब पडल्यास आणि ते लोकांच्या पिण्यात आल्यास अख्ख्या शहराचा मृत्यू होऊ शकतो.

  नेमका कसा असतो हा मासा
  जगातील कुठल्याही माशांपेक्षा हा मासा वेगळा आहे. माशांचे शरीर मऊ असते. परंतु, हा मासा टनक आणि कठोर असतो. स्टोन फिशचे आवरण दगडाप्रमाणे कठोर असल्याने त्याला स्टोन फिश असे नाव देण्यात आले आहे. तसेच पहिल्या नजरेत याचा आकार मानवी चेहऱ्यासारखा दिसतो.

 • Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths
 • Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths
 • Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths
 • Most Poisonous Fish On Earth Which Looks Like Human Face, Can Cause Mass Deaths

Trending