• Home
  • Sports
  • Most run scorer of Cricket World Cup, Rohit Sharma on Top

Worldcup2019 / WorldCup/ रोहित शर्मा 648 रनासोबत टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थानी तर विराट 11व्या स्थानावर, जाणून घ्या इतर फलंदाजांची कामगिरी


डेविड वॉर्नर 10 सामन्यात 647 रनासोबत दुसऱ्या स्थानावर, त्याने यात तीन शतकही लगावले आहेत

दिव्य मराठी

Jul 15,2019 01:37:48 PM IST

स्पोर्ट डेस्क- इंग्लंडने न्यूजीलंडला पराभूत करत विश्वविजेते पद आपल्या नावावर केले. भारतीय टीम भलेही टूर्नामेंटच्या सेमीफायनलमधून बाहेर गेली आहे, पण भारतीय ओपनर रोहित शर्मा टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त रन बनवणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 9 सामन्यात 648 रन बनवले आहेत. त्याच्या नंतर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आहे, जो रोहित पेक्षा फक्त 1 रनाने मागे आहे. वॉर्नरने टूर्नामेंटच्या 10 सामन्यात 647 रन बनवले.


टूर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त रन बनवणाऱ्या टॉप-11 फलंदाजांच्या लिस्टमध्ये इंग्लडचे 4, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 2-2 फलंदाज आहेत. रोहितशिवाय विराट कोहलीने (9 सामन्यात, 443 रन) काढून लिस्टमध्ये आपली जागा पक्की केली. फायनल सामन्यात इंग्लडच्या जो रूट आणि न्यूजीलंडच्या केन विलियम्सनकडे मोठी कामगिरी करून वॉर्नर आणि रोहितच्या पुढे जाण्याची संधी होती, पण ते संधी साधू शकले नाहीत.

वर्ल्ड कप 2019 मध्ये सर्वाधिक धावा काढणारे टॉप 11 फलंदाज

क्र. फलंदाज सामने नाबाद रन बेस्ट सरासरी 100/50 4/6
1. रोहित शर्मा (भारत) 9 1 648 140 81 5/1 67/14
2. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 10 1 647 166 71.88 3/3 66/8
3. शाकिब अल हसन (बांग्लादेश) 8 1 606 124* 86.57 2/5 60/2
4. केन विलियम्सन (न्यूजीलंड) 9 2 578 148 82.57 2/2 50/3
5. जो रूट (इंग्डंड) 11 2 556 107 61.77 2/3 48/2
6. जॉनी बेयरस्टॉ (इंग्लंड) 11 0 532 111 52.80 2/2 67/11
7. एरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) 10 0 507 153 50.70 2/3 47/18
8.

बाबर आजम (पाकिस्तान)

8 1 474 101* 67.71 1/3 50/2
9. बेन स्टोक्स (इंग्लंड) 10 3 465 89 66.42 0/5 38/11
10. जेसन रॉय (इंग्लंड) 7 0 443 153 63.28 1/4 51/12
11.

विराट कोहली (भारत)

9 1 443 82 55.37 0/5 38/2


रोहित शर्माची विश्वचषकातील कामगिरी

विरुद्ध संघ रन बॉल स्ट्राइक रेट 4 6
दक्षिण अफ्रीका 122* 144 84.72 13 2
ऑस्ट्रेलिया 57 70 81.42 3 1
पाकिस्तान 140 113 123.89 14 3
अफगानिस्तान 1 10 10 0 0
विंडीज 18 23 78.26 1 1
इंग्लंड 102 109 93.57 15 0
बांग्लादेश 104 92 113.04 7 5
श्रीलंका 103 94 109.57 14 2
न्यूजीलंड 1 4 25 0 0
X