Home | Khabrein Jara Hat Ke | Most Shocking Male Initiation Rituals

'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी या देशांत आहेत या 10 SHOCKING पध्दती, या क्रूर प्रथांविषयी वाचून येईल अंगावर शहारा!!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:19 AM IST

जगात अनेक देशांच्या विविध संस्कृती, परंपरा आणि प्रथा आहेत. परंतु याच परंपरांमध्ये काही प्रथा खूपच क्रूर आहेत.

 • Most Shocking Male Initiation Rituals
  नॉर्थ डकोटामध्ये मँडन जनजातीचे लोक शरीरात स्क्रू लावून दोरीला लटकतात.

  जगात अनेक देशांच्या विविध संस्कृती, परंपरा आणि प्रथा आहेत. परंतु याच परंपरांमध्ये काही प्रथा खूपच क्रूर आहेत. त्यांधील एक म्हणजे, पुरुषांना आपले पौरुषत्व सिध्द करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. अनेक देशांत आजसुध्दा पुरुषांना समाजात आपले मुख्य स्थान बनवण्यासाठी स्वत:ला शक्तिशाली दाखवावे लागते. त्यासाठी अनेक क्रूर आणि विचित्र पध्दतींचा अवलंब करावा लागतो.

  अनेक समाजाचे लोक खूपच क्रूर पध्दतीने आपले पौरुषत्व सिध्द करतात. मात्र काही पध्दती इतिहासाचा एक भाग आहे. आज आम्ही तुम्हाला काही देशांमध्ये 'पौरुषत्व' सिध्द करण्याच्या नावाखाली प्रचलित असलेल्या चित्र-विचित्र प्रथांविषयी...


  मँडन टॉर्चर-
  नॉर्थ डकोटामध्ये मँडन सामुदयामध्ये धार्मिक परंपरा आहे, त्याला ओकिपा म्हटले जाते. या उत्सवात वयाच्या आठव्या वर्षीच मुलांना टॉर्चर केले जाते. येथे 'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी अनेक दिवस उपाशी राहावे लागते. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्क्रू लावून दोरीला लटकवले जाते. जो सर्वात जास्त वेळ लटकतो, त्यांना मँडन समुदायाच्या नेत्यांमध्ये सामील केले जाते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही क्रूर प्रथेंविषयी...

 • Most Shocking Male Initiation Rituals
  पश्चिम आफ्रिकेत फुलानी समुदयात 'पौरुषत्व' बनवण्यासाठी कोड्यांची लढाई होते.

  फुलानी प्रजातीमध्ये कोड्यांची लढाई- 
   

  पश्चिम आफ्रिकेमध्ये फुलानी समुदायामध्ये 'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी कोड्यांची लढाई होते. त्यामध्ये चाकू आणि धारदार छडीचासुध्दा वापर केला जातो. हत्यार तयार असेल तर समोरच्याचा सामना करावा लागतो. प्रत्येक तरुणाला तीन बुक्के मारले जातात. जो सर्वाधिक सहन करू शकतो, त्याला विजेता ठरवले जाते. याचा निर्णय सामान्य जनता घेते. जे तरुण या परिक्षेत पास होत नाहीत, त्यांना मुलगा असल्याचा दर्जा मिळत नाही. 

 • Most Shocking Male Initiation Rituals
  दक्षिण पॅसिफिक आयलँड नॅशन पेन्टेकॉस्टमध्ये व्हॅनाटू जातीच्या तरुणांना 100 फुट की उंचीवरून उडी मारावी लागते.

  100 फुट उंचावरून उडी मारणे- 
   

  दक्षिण पॅसिफिक आयलँड नॅशन पेन्टाकॉस्टमध्ये व्हॅनाटू जातीच्या तरुणांना 100 फुट उंचावरून उडी मारावी लागते. ते आपल्या गुडघ्याला दोरी बांधून उंचावरून उडी मारतात. दोरीमुळे ते जमीनीपासून काही अंतर उंचावर लटकतात. हा खेळ खेळणे त्यांच्या जीव धोक्यात टाकण्यासारखा आहे. शरीराला जखमा होऊ शकतो आणि पाठीचा कण्याला नुकसान पोहण्याची शक्यता असते. ही एक 'पौरुषत्व' सिध्द करण्याची 1500 वर्षे जूनी परंपरा आहे. 

   

 • Most Shocking Male Initiation Rituals
  केन्या आणि तंजानियामध्ये मसाई जनजातीच्या परंपरेंर्गत सिंहाची शिकार करावी लागते.

  मसाई- लॉयन फायटिंग :
   
  केन्या आणि तंजानियामध्ये मसाई जनजातीचे लोकांची ही परंपरा आता संपुष्टात आली आहे. पूर्वी 'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी भाल्याने सिंहाची शिकार करावी लागत होती. येथे समाजात 6 ते 10 वर्षांनी एका प्रमुख्य संरक्षक ग्रुपची निवड केली जाते. 

 • Most Shocking Male Initiation Rituals
  पापुआ न्यूगिनीमध्ये मतौसा जनजातीचे लोक आपल्या मुलाच्या जीभेला दगडाने ठेचून रक्त काढतात. जेणेकरून तो शुद्ध व्हावा.

  रक्तस्त्राव करणे- 
   
  पापुआ न्यूगिनीमध्ये मतौसा जनजातीचे लोक आपल्या मुलांना महिलांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी विचित्र पध्दतींचा अवलंब करतात. मुलांना पोट साफ करण्यासाठी एका बारीक बाणाचा वापर करावा लागतो, जेणेकरून त्याने उलटी होते. त्यानंतर तो बाण त्याच्या नाकात टोचला जातो, जेणेकरून त्याचे वाईट दोष दूर होतील. त्यानंतर त्या मुलांच्या जीभेला दगडाने ठेचतात आणि रक्त काढले जाते. असे केल्याने तो मुलगा शुध्द झाला असे समजले जाते. 

 • Most Shocking Male Initiation Rituals
  पापुआ न्यूगिनीच्या सेपिक जनजातीचे मुले पुरुष बनण्यासाठी शरीरावर गोंदवून घेतात.

  शरीर गोंदवणे-
   
  पापुआ न्यूगिनीमध्ये सेपिक जनजातीच्या तरुणाना पुरुष होण्यासाठी शरीरावर गोंदवावे लागते. तरुणांना मानसिकरित्या कठोर बनवावे लागते. जोपर्यंत ते या प्रक्रियेतून जात नाहीत तोपर्यंत त्यांना स्त्रीयासारखी वागणूक दिली जाते. आपल्या शरीरावर अशा क्रूर पध्दतीने गोंदवून घेणे खूप कठिण आहे. 
   

 • Most Shocking Male Initiation Rituals
  ब्राझीलच्या सॅटारे-मावे जनजातीमध्ये बुलेट मुंग्यांनी मुलांना हाताला चावा घ्यावा लागतो.

  बुलेट मुंग्यांकडून चावा घेणे:
   
  ब्राझीलच्या अमेजनच्या जंगलात राहणारे सॅटारे-मावे जनजातीत परंपरा आहे, की बुलेट मुंग्यामध्ये मुलांना दोन्ही हात टाकावे लागते. 10 मिनीट मुलांना हे सहन करावे लागते. जर जे असे करण्यात यशस्वी झाले तर त्यानंतर त्यांना 19 वेळा आपले हातमोज्यात ठेवावे लागतात. त्यानंतर त्यांना 'पुरुष' मानले जाते. बुलेट मुग्यांनी घेतलेला चावा अनेक दिवस त्रासदायक ठरतो. ब्राझीलच्या घनदाट जंगलात मुंग्या सापडतात. त्यांच्या चाव्याने त्रास होतो. म्हणून त्यांना बुलेट मुंग्या म्हणतात. 
   

 • Most Shocking Male Initiation Rituals
  दक्षिण आफ्रिकेत झोसा जनजातीचे लोक तरुणांचा का खतना करतात.

  तरुणांचा खतना- 
   
  लहन मुलांच खतना करण्याची पध्दत असते. मात्र दक्षिण आफ्रिकेत झोसा जनजातीचे लोक तरुणांचा खतना करतात. त्यानंतर त्यांना वयस्क मानले जाते. खतनानंतर तरुणाला एका झोपडीत उपाशी ठेवले जाते. कारण संसर्गाची सर्वाधिक भिती असते. 

 • Most Shocking Male Initiation Rituals
  फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे.

  अल्गोंकुइन इंडियन ट्रिप- 
   
  उत्तर कॅनाडा, मिस्सीसिपी नदीच्या आसपास राहणारे अल्गोंकुइन इंडियन ट्राइबमध्ये 'पुरुष' म्हणवून घेण्यासाठी अंमली पदार्थ खावे लागतात. तरुणांना 20 दिवस एकटे सोडले जाते आणि त्यांना विषारी पदार्थ 'व्य्सोकॅन' खावे लागते. यामुळे ब्रेनवॉश होतो. तरुण लवकरच या नशेतून बाहेर पडतात, त्यांना शक्तिशाली मानले जाते. 
   

 • Most Shocking Male Initiation Rituals
  फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे.

  स्पार्टन कल्चरमध्ये तरुणांना वयाच्या 7व्या वर्षीपासून ते 17 वर्षांपर्यंत मार्शल आर्टचे ट्रेनिंग दिले जाते. ट्रेनिंगनंतर त्यांना आपली तयारी परिक्षा द्यावी लागते. त्यासाठी त्यांना गुलामांना मारावे लागते. जर ते यात यशस्वी झाले नाही तर त्यांना वाईटरित्या टॉर्चर केले जाते. 
   
   

Trending