Home | Khabrein Jara Hat Ke | Most Shocking Photos Around The Worlds

आजपर्यंतच्या सर्वात भयंकर छळाचे हे PHOTOS, हादरवून टाकतील बघणाऱ्याला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:01 AM IST

यातील प्रत्येक फोटो असा, जो विसरणे जगाला अशक्य

 • Most Shocking Photos Around The Worlds

  छायाचित्रांमध्ये आठवणी एकवटलेल्या असतात. पण प्रत्येकवेळी फोटोतील आठवणी या सुखदच असतील असे नाही. काही आठवणी फारच त्रासदायकही असतात. जगाच्या इतिहासातही अशा अनेक घटना दडल्या आहेत, ज्याच्या वेदनादायी आठवणी फोटोंमध्ये कैद आहेत. त्यात क्रौर्य, दुष्काळ, महामारी यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक फोटो असा आहे जो विसरणे शक्यच होत नाही.

  पहिला फोटो शिक्षा देण्याच्या क्रूर पद्धतीचा..

  पेटीत कैद गुन्हेगार..
  - हा फोटो मंगोलियाचा आहे. 1913 मध्ये काढलेला हा फोटो नॅशनल जियोग्राफिकमध्ये प्रकाशित करण्यात आला होता.
  - या पद्धतीने महिलेला शिक्षा दिली होती. मंगोलियात त्याकाळी अशा प्रकारे पेटीत कैद करून सिक्षा दिली जायची. पेटीतील एखा लहान छिद्रातून अन्न पाणी दिले जायचे.
  - पेटीत नीट बसताही येणार नाही एवढी कमी जागा असायची. गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार व्यक्तीला किती दिवस यात कैद ठेवायचे ते ठरवले जायचे. सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगाराला या पेटीत ठेवले जायचे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, इतिहासातील असेच धक्का देणारे काही Photos...

 • Most Shocking Photos Around The Worlds

  हैतीमध्ये 2010 मध्ये एक व्यक्ती मैदानात मृतदेह फेकत असल्याचे दिसत आहे. या मैदानाला मेकशिफ्ट मर्क्युरी बनवले होते.

 • Most Shocking Photos Around The Worlds

  जेम्स नॅचवेने 1993 मध्ये सुडानच्या दुष्काळी भागात हा फोटो काढला होता. यात एक व्यक्ती अन्न मिळवण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. 

 • Most Shocking Photos Around The Worlds

  केवळ 100 वर्षांपूर्वी चीनमध्ये गंभीर गुन्हा करणाऱ्याला चौकात अशा प्रकारे मारले जायचे. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  नाझी शिबिरात बुलडोजरच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावताना हिटलरचा सैनिक. या कॅम्पचे नाव बरजेन-बेलसेन होते. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. हा एवढा शक्तिशाली होता की, अनेकांची हवेत अक्षरशः वाफ झाली. त्यांची फक्त एवी खूण शिल्लक राहिली होती. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  ब्रिटिश फोटोग्राफर विल्यम सॉन्डर्सने 1850 मध्ये सार्वजनिकरित्यी शीर कापण्याच्या शिक्षेचा फोटो काढला होता. पण हा फेक पोटो असल्याचे म्हणतात. कारण त्या काळात फोटोसाठी बराच वेळ स्तब्ध उभे राहावे लागायचे. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  1975 मध्ये आगीतून वाचण्यासाठी वरच्या मजल्यावरील एक आया आणि मुलीने अशी उडी मारली होती. त्यात आयाचा मृत्यू झाला पण मुली तिच्या अंगावर पडल्याने ती वाचली. 

 • Most Shocking Photos Around The Worlds

  24 फेब्रुवारी 1970 चा हा फोटो आहे. कीथ स्पॅसफोर्ड नावाच्या 14 वर्षाच्या ऑस्ट्रेलियन तरुणाला विमानाबाहेर बसून प्रवास करायचा होता. त्यासाठी तो सिडनी-टोकियो विमानच्या खाली लपून बसला. विमानाने उड्डाण घेताच त्याने उडी मारली आणि 200 फुटावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  1994 मध्ये आफ्रिकेच्या रवांडामद्ये तुत्सी आणि हुतू समुदायातील संघर्षाचा फोटो. भिंतीवर एका चिमुरड्याच्या रक्ताने झालेल्या खुणा आहेत. 100 दिवसांच्या या संघर्षात त्यावेळी 80 हजार जणांचा मृत्यू झाला होता. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  दुसऱ्या शिनो-जापानी युद्धातील पीडित मुलगा. याला शांघाय बेबी म्हटले जाते. संपूर्ण घर उध्वस्त होऊनही तो बचावला होता. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  हा फोटो 1918 च्या स्पॅनिश फ्लू महामारीचा आहे. जगभरात 50 कोटी लोकांला लागण झाली आणि 2 ते 5 कोटी मारले गेले होते. त्यावेळी लागण होऊ नये म्हणून मास्क लावून बेसबृल खेळायचे. 

   

 • Most Shocking Photos Around The Worlds

  यूक्रेनमध्ये 1933 मध्ये मानवी इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळांपैकी एक दुष्काळ पाहायला मिळाला. त्यावेळी खार्विक शहरातील या फोटोप्रमाणे रस्त्यांवर मृतदेह पडलेले असायचे. 

 • Most Shocking Photos Around The Worlds

  1868 मधील ब्रिटिश जहाज एचएमएस डॅफ्नेमध्ये असलेले चिमुरडे गुलाम. नंतर यांना सोडवण्यात आले होते. 

 • Most Shocking Photos Around The Worlds

  पूर्व जर्मनीतील एका मुलाला वाचवणारा एक सैनिक. जर्मनीच्या विभाजनात तो आई वडिलांपासून विभक्त झाला होता. सैनिकाने असे करणे नियमभंग होता. पण तरीही त्याने असे केले. 

Trending