आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैदीचा राजकुमार बनून ३० वर्षांत लाेकांना घातला ५५ काेटींचा गंडा ,१८ वर्षांचा तुरुंगवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - अमेरिकेतल्या फ्लाेरीडामध्ये राहणारी एक व्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून स्वत:ला साैदीचा राजकुमार म्हणून वावरत हाेती. याचा फायदा घेत या व्यक्तीने फसवणूक करून लाेकांना जवळपास ८० लाख डाॅलरचा (जवळपास ५५ काेटी रुपये) गंडा घातला. या प्रकरणी त्याला १८ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आराेपीचे नाव अंॅथनी गिग्नेक (४८) असून ताे स्वत:ला खलिद बिन अल- सऊद असे म्हणवून घ्यायचा व सतत तरुणी आणि सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असायचा. मियामीच्या उच्चभ्रू वस्तीतल्या फिशर बेटावर रहायचा आणि उच्चायुक्तांना दिला जाणारा परवाना  बनावटरित्या तयार करून फेरारी माेटारीतून फिरायचा. गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने शहरातील अनेक लाेकांकडून  त्याने पैसे गाेळा केले.ही रक्कम न गुंतवता उंची कपड्यांची खरेदी , याॅट आणि खासगी जेट विमानावर खर्च केले. 


मिशिगनमधल्या परिवराने ७ वर्षांचा असताना घेतले हाेते दत्तक
अमेरिकेचे महाभिवक्ता एरियाना फजार्डाे आेरशान म्हणाले, साैदीचा राजकुमार असल्याची बतावणी करून अंॅथनी गिग्नेकने स्वत:ला सादर केले. नकली प्रतिमेचा वापर करून त्याने आंतरराष्ट्रीय फसवणूक केली असल्याने त्याला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. काेलंबियात जन्मलेल्या गिग्नेकला ७ वर्षांचा असताना मिशिगनच्या एका कुटुंबाने दत्तक घेतले हाेते. वयाच्या १७ व्या वर्षी अनेक फसवणूक प्रकरणात दाेषी ठरवून त्याला अटक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...