Home | National | Madhya Pradesh | Mother And 2 Daughter Dies Due To Building Collapsed In Heavy Rainfall in Bhopal

रात्री 1 वाजता गाढ झोपेत होते कुटुंब, तेवढ्यात अचानक झाला विध्वंस, बेडरूम बनले कब्रस्तान, मायलेकींना ओरडण्याचीसुद्धा संधी मिळाली नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2018, 04:52 PM IST

भोपाळमध्ये मुसळधार पावसात 5 जणांचा मृत्यू, एक बेपत्ता; बुधवारी रात्री पुन्हा बिघडू शकते परिस्थिती, अलर्ट जारी.

 • Mother And 2 Daughter Dies Due To Building Collapsed In Heavy Rainfall in Bhopal
  मृत महिला शुमायला, मोठी मुलगी तंजिला, छोटी मुलगी अरिवा.

  भोपाळ - भोपाळमध्ये सोमवारी सकाळी 8.30 वाजेपासून ते मंगळवार सकाळी 8.30 पर्यंत झालेल्या 6.25 इंच पावसामुळे 3 कुटुंबाचा आनंद हिरावला. सोमवारी रात्री 11 वाजेनंतर मंगळवार पहाटे 3 पर्यँत 3 इंच मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 5 जणांचा जीव गेला. एक जण बेपत्ता आहे.


  पत्नी-मुलींचा आवाजही ऐकू आला नाही...
  - मोठी दुर्घटना किलोल पार्कजवळ घडली. येथील सरकारी बंगल्याच्या 150 फूट लांब आणि 20 फूट उंच विटांची भिंत वाहून 30 वर्षीय महिला शुमायला आणि त्यांच्या 2 मुली - 9 वर्षीय तंजिला आणि 3 वर्षीय अरिवाचा मृत्यू झाला. अपघातावेळी तिघीही बेडरूममध्ये झोपल्या होत्या.

  - धोबीघाट किलोल पार्कच्या रहिवासी 32 वर्षीय अजिम म्हणाले, ते पत्नी शुमायला, मोठी मुलगी तंजिला आणि छोटी मुलगी अरिवासोबत बेडरूममध्ये झोपलेले होते. रात्री सव्वा वाजता वाटले की, छतावर काहीतरी पडत आहे. पुढच्याच क्षणी असा विध्वंस झाला की, बेडरूम कब्रस्तानमध्ये बदलले. पूर्ण छत आणि पाणी आमच्यावर पडले.

  - मी ढिगाऱ्याखाली दबलेलो होतो. दोन्ही मुली आणि पत्नीचा आवाजही ऐकू आला नाही. मंगळवारी सकाळी लोकांनी मला रुग्णालयात नेले. शुद्ध आल्यावर कळले की, माझी पत्नी आणि दोन्ही मुली आता या जगात नाहीत.


  12 वर्षांनंतर... ऑगस्टमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस
  भोपाळमध्ये मागच्या 24 तासांत सव्वा सहा इंच पाऊस झाला. 12 वर्षांनंतर ऑगस्टमध्ये एकाच दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. 2006 मध्ये ऑगस्टमध्ये 24 तासांत 1 तारखेला सव्वा सहा इंचाहून जास्त आणि 14 तारखेला 11.65 इंच पाऊस झाला होता.


  मुख्यमंत्र्यांचे आवाहन
  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नागरिकांना मुसळधार पावसात सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून संकटात असलेल्यांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. सीएमनी ट्विट करत म्हटले की, भोपाळसहित मध्य प्रदेशच्या विविध परिसरात पाऊस आणि पुरामुळे दगावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. स्थितीवर आमची सतत नजर आहे. नागरिकांना मदत केली जात आहे. तुम्हा सर्वांना माझे आवाहन आहे की, एखादा संकटात असेल तर क्षमतेनुसार त्यांची मदत करा.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी Photos...

 • Mother And 2 Daughter Dies Due To Building Collapsed In Heavy Rainfall in Bhopal
  ढिगाऱ्याखाली दबलेला पलंग. यावर मायलेकी झोपलेल्या होत्या.
 • Mother And 2 Daughter Dies Due To Building Collapsed In Heavy Rainfall in Bhopal
  20 फूट उंच भिंत कोसळल्याने मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 • Mother And 2 Daughter Dies Due To Building Collapsed In Heavy Rainfall in Bhopal

  सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भोपाळच्या बाग मुंशी हुसैन खां तलावाचे पाणी ओव्हर फ्लो होऊन शाहजहानाबाद परिसरातील घरांमध्ये घुसले. येथील रहिवासी म्हणाले, पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, घरातील सामान तसेच सोडून जीव वाचवावा लागला. पाण्यात सगळे वाहून गेले. लोकांनी कसाबसा स्वत:चा जीव वाचवला.

Trending