आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला वाममार्गी लावणाऱ्या मायलेकीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मायलेकींना बीड येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडली होती. सुनीता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे(रा. सिरसदेवी ता गेवराई) अशी शिक्षा झालेल्या मायलेकीची नावे आहेत. 


बीड शहरातील  अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत सुनीता व शारदा चांदणे या मायलेकींनी तिला पैशांचे आमिष दाखवून सिरसदेवी बसस्थानक परिसरातील स्वत:च्या घरी तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या महिला फौजदार दीपाली गिते यांनी डमी ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली होती. यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी पीएसआय दीपाली गितेंनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिरसदेवी येथे छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पीडित मुलीची सुटका केली होती. या प्रकरणी गितेंच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे या मायलेकींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलामानुसार गुन्हा नोंद केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणी बाजू मांडली. न्या. शेख यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी धरून दहा वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.