आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पाठोपाठ झाल्या पाच मुली, सहावी नको म्हणून आई वडिलांनी हॉस्पिटलमध्येत विकले.. असे फुटले बिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर - आई वडिलांनीच नवजात चिमुरडीचा सौदार करून तिला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याला मुलगी झाल्याचे समजल्यानंतर या दाम्पत्याने ठरावीक रक्कम ठरवून त्यांची मुलगी दुसऱ्यांना सोपवली. पण पैशाच्या देवाण घेवाणीच्या वेळी दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये वाद झाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. चौकशीदरम्यान चिमुरडीच्या पित्याने सांगितलेले कारण ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला. 


सांगितले असे कारण...
वाद झाल्यानंतर जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली, तेव्हा चिमुरडीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना आधीच्या पाच मुली आहेत. त्यांना आणखी एक मुलगी नको होती त्यामुळे त्यांनी या मुलीचा सौदा केला. पण देवाण घेवाणीच्या मुद्द्यावरून दोन्हील कुटुंबांमध्ये वाद झाले. 


एवढी रक्कम ठरली 
मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण सिंग मेडिकल कॉलेजमध्ये महिलेने एका चिमुरडीला जन्म दिला. आधीच पाच मुली असल्याने त्यांना ही मुलगी नको होती. त्यामुळे त्यांनी या चिमुरडीला अक्षरशः दुसऱ्या कुटुंबाला विकले. या सौद्यासाठी रक्कम ठरली 20 हजार रुपये. पण नवजात बाळ असल्याने हा व्यवहार उधारीवर ठरला होता. पण पैशाच्या देवाण घेवाणीच्या वेलई हॉस्पिटलमध्येच त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याठिकाणी प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे या सर्वांचे बिंग फुटले. पोलिसांनी मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...