आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसह 4 वर्षीय मुलाचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून, नागपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाणे वाढतच आहे. यातच आता नागपुरात मायलेकाचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याने राहणाऱ्या शाहू कुटुंबासोबत मदतनीस असलेल्या बिहारी तरुणाने मायलेकाचा जीव घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. 25 वर्षीय महिला आणि तिच्या 4 वर्षीय मुलाच्या खूनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये मूळ बिहारचे असलेल् दिनेश 25 वर्षीय पत्नी प्रियांका आणि चार वर्षांचा मुलगा अंशुल यांच्यासह राहत होते. मागील 15 दिवसांपासून मूळ बिहारचा असलेला रवी नावाचा तरुण त्यांच्यासोबत राहायला आला होता. दिनेश यांच्या घरी गणपती असूनही अंधार दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. पण आतून प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा उघडून पाहिले, तेव्हा प्रियांका आणि अंशुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि जवळच रक्ताने भरलेला बत्ताही आढळला.दिनेश शाहू यांना पत्नी आणि मुलाच्या हत्येने जबर धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे रवी बेपत्ता असल्यामुळे त्यानेच हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पती दिनेश यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू असून, हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.