आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड : जंगलात झाडावर साडीच्या एका टोकाला होते प्रेग्नेंट महिलेचे शव तर दुसऱ्या टोकाला होते दीड वर्षाच्या मुलाचे शव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना (एमपी) - तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली गरोदर महिला आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे शव जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कुटुंबीय सर्वत्र यांचा शोध घेत होते. प्राथमिक तपासात समजले की, महिलेने आधी मुलाला आपल्या साडीच्या पदराने गळफास दिला आणि नंतर स्वतः साडीच्या दुसऱ्या टोकाने गळफास घेतला. दोघांचेही पोस्टमॉर्टम करण्यात येत असून त्यानंतरच नेमकं काय घडले असेल हे समजू शकते. सांगण्यात येत आहे की, महिलेचे आपल्या पतीशी नेहमी भांडण व्हायचे. या व्यतिरिक्त सासरच्या लोकांसोबतही तिचे पटत नव्हते.


एकाच झाडाच्या फांदीवर लटकलेले होते दोघांचे शव
म्याना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारी 20 वर्षीय चिगरी आपला दीड वर्षाचा मुलगा सतीशला घेऊन 7 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. कुटुंबीय यांच्या शोधामध्ये सर्वत्र फिरत होते. महिलेच्या माहेरीही चौकशी केली परंतु तेथेही ती नव्हती. त्यानंतर म्याना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही शोधकार्य सुरु केले होते. परंतु तिसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबरला गावापासून चार किलोमीटर अंतरावर जंगलात दोघांचे शव आढळून आल्याची सूचना गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. एकाच झाडाच्या फांदीवर साडीच्या एका टोकाला मुलाचे शव होते तर दुसऱ्या टोकाला महिला लटकलेली होती. शव कुजून गेले होते. महिला गरोदर होती.


मुलाच्या हत्येनंतर महिलेने केली आत्महत्या
एफएसएल अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, महिलेने सुरुवातीला मुलाला गळफास दिला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत.


रागात येऊन मुलाला घेऊन गेली होती महिला
म्याना स्टेशनचे पोलीस अधिकारी राकेश गुप्ता यांच्यानुसार, 7 ऑक्टोबरला महिलेचे पतीसोबत कोणत्या तरी कारणामुळे वाद झाले होते. याच रागामध्ये ती आपल्याला मुलाला घेऊन निघून गेली होती. पतीला वाटले की, ती माहेरी गेली असेल आणि यामुळे त्याने शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. दोन दिवसांनी ती माहेरी नसल्याचे समजल्यानंतर तिचा शोध सुरु केला. बुधवारी दोघांचेही शव झाडाला लटकलेले आढळून आले. पोलीस पोहोचल्यानंतर पती घरातून पळून गेला.

बातम्या आणखी आहेत...