Home | Khabrein Jara Hat Ke | Mother buried her newborn daughter alive Podilsky in Ukraine

पोटदुखीने त्रस्त असलेल्या महिलेला तिच्या बहिणीने नेले रूग्णलयात, महिलेने सांगितले स्वत:ला गरोदर, म्हणाली 6 महिन्यांचे बाळ होते पण मिसकॅरेज झाले, नंतर समोर आले हे भयानक सत्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 04:31 PM IST

डॉक्टरांना संशय येताच बोलवली पोलिस

 • Mother buried her newborn daughter alive Podilsky in Ukraine

  पोदिल्स्की- एका निर्दयी आईने आपल्या नवजात मुलीला जिवंत गाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. यूक्रेनच्या एका महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. पण तिला ही मुलगी नको होती, त्यामुळे तिने मुलीचा जन्म होताच तिला एका प्लास्टीकच्या पिशवीत टाकले आणि घरामागे जिवंत गाडले. महिला परत घरी परतल्यावर तिच्या पोटात दुखणे सुरू झाले. त्यानंतर महिलेच्या बहणीने तिला तत्काळ रूग्णलायत नेले. तिथे डॉक्टरांना ती 6 महिन्याची गर्भवती होते पण मिसकॅरेज झाले असे खोटे सांगितले. पण तिच्या बोलण्यावरून डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवले.


  घाबरलेली दिसल्यामुळे आला संशय
  - रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या पोटात दुखत असल्याने ती आली होती. तिचा गर्भपात झाला असल्याचे तिच्या बहिणीने सांगितले.पण महिलेला पाहताच ती घाबरलेली दिसत होती, त्यामुळेच तत्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. महिलेने खोटं सांगितलं की, तिचा गर्भपात झाल्यामुळे बाळ मृत जन्माला आले आणि त्यामुळेच त्याला घराच्या मागे गाडले आहे.


  फॉरेंसिक तपासात झाला खुलासा
  - पोलिसांनी महिलेने सांगितलेल्या जागेवरून बाळाचा मृतदेह बाहेर काढून त्याला फोरेंसिक तपासासाठी पाठवला.
  - फॉरेंसिक तपासात समोर आले की, जन्मलेले बाळ जिंवत होते आणि त्याचा श्वास बंद झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
  - सध्या महिलेला पोलिसांनी अटक केले असून पुढील तपास सुरू आहे.

Trending