आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Carried Two Dead Babies Inside Her Stomache For FullTime Because Of Shocking Reason

गर्भात होते 3 बाळ, पण 16 व्या आठवड्यात झाला दोघांचा मृत्यू, मग तिस-या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी घेतला विचित्र निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिवरपूल. इंग्लंडच्या लिवरपूलमध्ये राहणा-या एका महिलेच्या प्रेग्नेसीची एक हैराण करणारी कथा समोर आली आहे. येथे राहणा-या बर्नाडेट मर्फीने 2014 मध्ये 2 मृत मुलांना पुर्ण नऊ महिने पोटात ठेवले. या मुलांचा मृत्यू प्रेग्नेंसीच्या तिस-या महिन्यातच झाला होता. महिलेने तीन वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून यामागची कहाणी शेअर केली आहे. 


- मर्फीने सांगितले की, ती वयाच्या 26 व्या वर्षी आई होणार होते. डॉक्टरांनी सोनोग्राफी करुन सांगितले की, मर्फीच्या पोटात एक नाही तर तीन-तीन मुलं आहेत, यामुळे या पती-पत्नीला अत्यानंद झाला. 
- पण तिस-या महिन्याच्या चेकअपनंतर त्यांचे मन दुखावणारी बातमी त्यांना समजली.
 
तीनमधून दोघांचा झाला होता मृत्यू 
- डॉक्टरांना कळाले की, 16 व्या आठवड्यात तीनमधून दोन मुलांचे हार्ट बीट थांबले होते. दोघांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनुसार दोघांचा मृत्यू ट्विन-ट्विन ट्रान्सफ्यूजन सिंड्रोममुळे झाला होता. या आजारामुळे जुळ्या मुलांच्या गर्भनाळीमध्ये प्रॉब्लम येतो. 
- डॉक्टरांनी सांगितले की, तुमचे तिसरे बाळ जिवंत आहे. जर ऑपरेशन केले तर त्याचाही मृत्यू होईल. यानंतर मर्फीने दोन मेलेल्या बाळांसोबत प्रेग्नेंसी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला, यामुळे तिसरे बाळ वाचले असते. 

 

यानंतर झाला चमत्कार 
- अनेक अडचणींचा सामना करुन मर्फीने आपले निरोगी बाळ जेम्सला जन्म दिला. ती म्हणाली, "मला कधीच असे वाटले नाही माझं फक्त एकच बाळ जिंवत आहे. मी शेवटच्या महिन्यापर्यंत तिन्हीही बाळ जिवंत आहेत असे समजून सांभाळत राहिले. पण जेम्सचा जन्म झाला हा माझ्यासाठी अनोखा अनुभव होता. माझ्या तपस्येला फळ मिळाले होते."
- डॉक्टरांनी तिला सहा महिने अँटीबायोटिक दिले, यामुळे मेलेल्या बाळांमुळे इंफेक्शन होऊ शकले नाही. डॉक्टरांनी तिला सल्ला दिला की, तु कोणत्याही क्षणी मुलांना अबॉर्ट करु शकते. पण तरीही मर्फीने हार मानली नाही. 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...