crime / वर्ध्यात 2 मुलांना गळफास देत आईची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही 

दोन मुलांना गळफास देऊन आईनेही आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील एका कंपनीच्या परिसरामध्ये शुक्रवारी उघडकीस आली.

Aug 31,2019 09:36:29 AM IST

वर्धा : दोन मुलांना गळफास देऊन आईनेही आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील एका कंपनीच्या परिसरामध्ये शुक्रवारी उघडकीस आली. सविता आशिष साहू (३१), आयुष आशिष साहू (८) आणि ओरा आशिष साहू (३) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम गल्वा येथील कंपनीमध्ये आशिष साहू हे नोकरीला आहेत. त्यांना कंपनीच्या आवारात असलेल्या वसाहतीमध्ये राहण्यासाठी निवासस्थान देण्यात आले आहे. आशिष हे कंपनीत गेल्यानंतर सविता यांनी आधी मुलांना गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवले.

X