आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने 10 महिन्याच्या चिमुकलीला फासावर लटकवले, नंतर स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या: 4 दिवसांपूर्वीच झाले होते पतीचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उदयपूर (राजस्थान) - मांडवा परिसरात होळीच्या दिवशी एका महिलेने आपल्या 10 महिन्याच्या चिमुकलीला फासावर लटकवले. यानंतर स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांना शवगृहात ठेवले होते. सामाजिक स्तरावर कोणतीही तडजोड न झाल्यामुळे दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाले नव्हते. समजावून सांगितल्यानंतर पोस्टमार्टम झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 


दोघांवर एकाचवेळी करण्यात आले अंत्यसंस्कार

पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर गुरुवारी संध्याकाळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांच्या मते, होमलीचे पती राजीयाचा आजारामुळे चार दिवसांपूर्वीच निधन झाले. पतिच्या निधनानंतर होमली नैराश्यात गेली होती. यामुळे आत्महत्येचे हेच कारण समजले जात आहे. दोघांनी वर्षभरापूर्वीच प्रेम विवाह केला असल्याचे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...