आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या तीन पोरांची हत्या करुन निर्दयी आईने केली आत्महत्या, पुण्यात घडली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येथून ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील दिघी रोडवरील नूर मोहल्ल्यात एका क्रुर आईने आपल्या पोटच्या तीन मुलांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलांच्या हत्येनंतर आईनेही आत्महत्या केली आहे. आज(रविवार) संध्याकाळी घडलेल्या या हत्याकांडामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. अलफिया बागवान, झोया बागवान, जिआन बागवान अशी मृत मुलांची नावे असून फातिमा अक्रम बागवान असे निर्दयी मातेचे नाव आहे.


मृत फातिमाचा पती फळविक्रेता आहे. व्यावसायात तोटा झाल्याने तो आपल्या कुटुंबासहित तळेगाव दाभाडेमधून दिघीत राहण्यास आला होता. मृत फातिमा पतीला दुसरा कामधंदा करण्यास सांगत होती. नेमके या हत्या आणि आत्महत्येमागे काय कारण आहे, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. भोसरी पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...