आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्याची मुलगी झोपली होती खोलीत.. येऊ लागला विचित्र आवाज.. जाऊन पाहिले तर मुलीची अवस्था पाहून रडत होती मांजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंसास - अमेरिकेत एक कपल वारंवार प्रिमॅच्योर बाळांच्या मृत्यूमुळे तणावात होते. त्यांवी सलग तीन वेळा बाळ गमावले होते. कपलच्या घरी जेव्हा चौथ्या बाळाने जन्म घेतला तेव्हा ते बाळाच्या सेफ्टीबाबत अधिक सजग झाले. नेहमी बाळाच्या आसपास राहायचे आणि कॅमेऱ्यांने बाळावर लक्ष ठेवायचे. एक दिवस कपलने बाळाला वरच्या खोलीत एकटे सोडले. त्यानंतर बाळाच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागला. त्यांना धोक्याची जाणीव झाली ते धावत पोहोचले तर बाळ पूर्णपणे निळे पडले होते. मांजर रडत असल्याने ते लगेच धावकत आले. 


मांजरीने केले अलर्ट 
- बर्नेटा खाली आल्यानंतर काही वेळ बसली होती. काही वेळाने घरातील पाळलेली मांजरी खाली येऊन उड्या मारायला लागली होती. बर्नेटाला वाटले ती लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतेय. 
- त्यानंतर मांजर अचानक पायऱ्यांनी वर गेली आणि विचित्र आवाज करू लागली. ते ऐकूण घाबरलेली बर्नेटा मुलीच्या खोलीकडे पळाली आणि तिची अवस्था पाहून तिला धक्का बसला. 
- बर्नेटाचे बाळ स्टॅसीचे शरीर निळे पडले होते. तिला नीट श्वास घेता येत नव्हता. बर्नेटा प्रचंड घाबरली आणि बाळाला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली. 
- स्टॅसीला फुल रेस्पिरेटरी फेल्योरचा त्रास होत होता. त्यामुळे तिचा जीव जाण्याचा धोकाही होता. पण मांजरीने अलर्ट केल्याने तिला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. त्यामुळे तिचा जीव वाचला. 

बातम्या आणखी आहेत...