आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Daughter Kill Family Head After Their Affair With Same Lover Revealed In Bihar

एकाच युवकाशी होते माय-लेकीचे अनैतिक संबंध; आपल्याच धुंदीत असताना अचानक घरी आला पती, मग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - बिहारच्या भागलपूरमध्ये एका घराच्या अंगणात 35 वर्षीय पुरुषांचा मृतदेह सोमवारी सापडला. पोलिसांनी चौकशी करून 24 तासांतच पीडितच्या पत्नी आणि मुलीला अटक केली. चौकशीत मायलेकींनी जो खुलासा केला त्यावर पोलिस सुद्धा हैराण झाले. खून करण्यास या दोघींसोबत आणखी एका युवकाचा हात आहे. तो युवक या दोन्ही माय-लेकींचा प्रियकर होता. त्या दोघींसोबत त्याचे अफेअर होते. याच अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची महिलेने मुलगी आणि प्रियकरासोबत मिळून हत्या केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील एका गावात 35 वर्षीय कैलू दास आपल्या पत्नी, मुलगी आणि दोन मुलांसोबत राहत होता. पहिला आणि मोठा मुलगा शहराबाहेर काम करायचा. तर कैलू दास आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मिळून घराबाहेरच असलेले हॉटेल चालवायचा. या हॉटेलात काम करताना पत्नी सरिता आणि मुलगी जूली यांचे अनेकांशी संपर्क वाढले. त्यापैकीच एका युवकाने सरितासोबत मैत्री केली. हळू-हळू घरात येण्यास सुरुवात केली आणि सरिताची मुलगी जूलीसोबतही त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित केले. पतीला याबद्दल काहीच माहिती नव्हते. परंतु, हॉटेलात येणाऱ्या ग्राहकांना आणि गावातील मंडळीत चर्चा सुरू झाल्या. त्यापैकीच काहींनी थेट कैलू दासला याबद्दल सांगितले. गेल्या आठवड्यातच पती कैलू दासने आपल्या पत्नीला त्या युवकासोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणानंतर कैलू दास अचानक गायब झाला.


मोठा मुलगा घरी आला तेव्हा...
आपले वडील गायब झाल्याची माहिती मोठ्या मुलाला मिळाली तेव्हा तो सोमवारी गावात परतला. सुरुवातीला गावकऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. पोलिसांत तक्रार देत होता, त्याचवेळी मुलाची आई सरिता आणि बहीण जूली दोघीही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या. त्यांनीही कैलू बेपत्ता असल्याचे ढोंग केले. तेवढ्यात गावकऱ्यांचा घोळका पोलिस स्टेशनवर जमा झाला आणि त्यांनी सरिताच्या घरातून उग्र दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना अंगणातील एका खड्ड्यात कैलूचा मृतदेह सापडला.


संतप्त गावकऱ्यांकडून मायलेकीला मारहाण
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पती-पत्नीच्या भांडणानंतर सरिता आणि जूलीने आपल्या प्रियकरासमोर ही गोष्ट सांगितली. यानंतर तिघांनी मिळून कैलूच्या हत्येचा कट रचला. त्याच दिवशी रात्री घरातील सगळेच झोपेत असताना त्यांनी कैलूचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह घरातील अंगणात पुरला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच सर्वांनी गोंधळ घातला आणि पोलिस स्टेशन परिसरातच क्रूरकर्मा मायलेकीला बेदम मारहाण केली. त्या दोघीही सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या प्रियकाराचा शोध घेतला जात आहे.