आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असावा आईचा आहार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळाला सुरुवातीचे चार महिने मातेने दूध पाजावे. ६ महिने बाहेरचे किंवा पाणी सुद्धा देऊ नये. बाळाला फक्त दूध पाजावेे. त्यासाठी आईला जास्त दूध येणे गरजेचे आहे. मातेने जर चांगला आहार घेतला तर चांगले दूध येईल आणि बाळाचे आरोग्य चांगले राहील. तर पाहू आईच्या आहाराविषयी -- > आईचा आहार हा चौरस, सकस आणि परिपूर्ण असावा. स्तनपान देणाऱ्या मातेला वाढीव उष्मांक, कॅल्शियम, लोह ह्यांची खूप आवश्यकता असते. तेव्हा तिने नेहमीपेक्षा जास्त खायला पाहिजे. आणि त्याचबरोबर भरपूर पाणीही प्यायला हवे. > गरोदरपणी जर २५०० उष्मांक(कॅलरी) लागत असेल तर बाळंतपणात तर त्याहून जास्त उष्मांक(कॅलरी) लागत असतात. त्यासाठी रोजच्या जेवणात नाचणी, (नागली) बाजरी, गूळ, पालेभाज्या, विविध फळे त्याचबरोबर मांस, मासळी, मासे हेही खायला पाहिजे. > दूध जर आवडत असेल तर पनीर, दूध, ताक, चीज हे पदार्थ जेवणात घ्यावेत. तुपाचा वापर जेवणात, पोळीत जास्त करावा. > जोपर्यंत तुम्ही स्तनपान करत आहात तोपर्यंत कॅल्शियम, लोह, जीवनसत्वाच्या पूरक गोळ्या डॉक्टरांना विचारून घ्याव्यात. > अळीव, डिंक, शतावरी, ह्या पदार्थांमुळे प्रोलेक्टिन ह्या अंतस्रावाची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होते. तसेच दूध वाढीसाठी औषधे चालू आहेत, असा दिलासा मिळाल्यामुळेही दूध वाढण्यास मदत होत असते. त्याचप्रकारे दूध वाढवणारी औषधे - मेटोक्लोप्रोमाइडच्या १० मिलिग्रॅमच्या गोळ्या दिवसातून तीन वेळा दहा दिवस घेतल्यास दूध वाढत असते. ह्यासाठी प्रसूतीतज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता.