आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच आईनेही प्राण सोडले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच आईनेही प्राण सोडल्याची घटना शनिवारी घडली. जालना येथील क्रीडा अधिकारी संजय शंकरराव वणवे (४४, रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद) आठ दिवसांपू्र्वी आईला दवाखान्यात डबा देऊन घरी परतत होते. तेव्हा सेव्हन हिल उड्डाणपुलावर त्यांना एका चारचाकीने उडवले. १० जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण त्याची माहिती दोन दिवस नातेवाइकांनी संजय यांच्या आई वत्सलाबाई (६०) यांच्यापासून दडवली होती. १३ रोजी संजय यांच्या भगिनीने त्यांना किडनीवरील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचे ठरवले. तेव्हा मुलाशी बोलल्याशिवाय मी पुण्यात जाणार नाही, असे म्हणत वत्सलाबाईंनी अन्न-पाणी बंद केले. अखेर नाइलाज म्हणून एका नातेवाइकाने त्यांना संजय यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि चार तासांतच वत्सलाबाई यांनी प्राण सोडला. त्यांचा देह पुण्यातील एका रुग्णालयाला अभ्यासासाठी दान करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...