आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Call Girls च्या वेबसाइटवर सापडली हरवलेली मुलगी, आईनेच केली खरेदी; अशा अवस्थेत परतली घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित मुलगी एमी... - Divya Marathi
पीडित मुलगी एमी...

अॅटलांटा - अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या आईला तिचा पत्ता चक्क एका कॉल गर्ल्सच्या वेबसाइटवर लागला आहे. तिची मुलगी हरवले तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. ही चिमुकली मानव तस्करांची शिकार बनली होती. त्यांनीच या मुलीचे अपहरण करून दिला वेश्यालयात विकले. सेक्स सेवा देणाऱ्या एका वेबसाइटवर या आईला आपल्या मुलीची प्रोफाइल दिसून आली आहे. या सत्य कथेवर एक लघुपट सुद्धा तयार करण्यात आले. जे याच वर्षी प्रदर्शित करण्यात आले आहे. 


ऑनलाइन सेक्स ट्रेडमध्ये अशी अडकली...
- ही कहाणी अॅटलांटा येथे राहणाऱ्या कुबिकी प्राइड आणि तिची मुलगी एमी यांची आहे. एमी 13 वर्षांची असताना सेक्स ट्रेड आणि ह्युमन ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात आली होती. एमी शाळेतून घरी निघाली त्याचवेळी एका महिलेने तिला घरी सोडणार असल्याचे सांगत लिफ्ट दिली. 
- गेल्या 270 दिवसांपासून आई कुबिकी आपल्या मुलीचा शोध घेत होती. तिने पोलिसांत तक्रार करणे आणि बेपत्ता झाल्याचे पोस्टर छापण्यापासून ऑनलाइन मोहिम सुद्धा सुरू केली. कुबिकी बॅकपेज डॉटकॉम वेबसाइट स्क्रोल करत होती. त्याचवेळी एस्कॉर्ट सेक्शनमध्ये तिला चक्क आपल्या मुलीचा फोटो दिसला. 
- प्राइडने सांगितल्याप्रमाणे, वेबसाइटवर वरतून ही तिसरी लिंक होती. त्यावर खूप सारे स्टार्स आणि हार्ट शेपचे स्टिकर्स होते. त्यावर यंग अॅन्ड न्यू असे लिहिले होते. त्याच स्टार्स आणि हार्टने कुबिकीचे लक्ष वेधले. त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या मुलीचा सेमी न्यूड फोटो ब्लिंक झाला. एमीने फक्त एक अंडरवेअर घातले होते आणि ती पोझ देत होती. यानंतर कुबिकीने त्या अॅडमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून सर्व्हिस खरेदी करणार असल्याचे सांगितले.

 

ड्रग अॅडिक्ट बनली, झाला लैंगिक छळ
प्राइड सर्व्हिस घेण्याच्या बहाण्याने मुलगी एमीला घरी घेऊन आली. त्याचवेळी तिला आपली मुलगी एक ड्रग अॅडिक्ट बनल्याचे कळाले. तिचा लैंगिक छळ झाला होता. तिला मारहाण सुद्धा करण्यात आली होती. तिच्या शरीरावर सर्वत्र चाकूचे घाव, मारहाणीच्या खुणा आणि सिगारेटचे चटके दिल्याचे निशाण होते. तिच्या डोक्यावरील सर्वच केस काढण्यात आले होते. एमीने दोनदा व्यसनामुळे घर सोडून पळाली. यानंतर ती पुन्हा आपल्याच आईच्या घरी परतली. 


वेबसाइटवर कारवाई नाहीच
एमीचे अपहरण करून मानव तस्करी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. तिला 2010 मध्ये कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा देखील सुनावली होती. तरीही एमीचे ऑनलाइन फोटो आणि जाहिरात हटवण्यात आले नाही. 2011 मध्ये प्राइडने बॅकपेज डॉटकॉमवर खटला दाखल केला होता. तसेच वेबसाइटवर बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देण्याचे आरोप लावले होते. परंतु, तिचा खटला 230 कम्युनिकेशन्स डिसेन्सी अॅक्ट अंतर्गत रद्द करण्यात आला. बॅकपेज अमेरिकेतील सर्वात मोठी ऑनलाइन क्लासिफाइड वेबसाइट आहे. देशातील 80 टक्के ह्युमन ट्रॅफिकिंगच्या जाहिराती यावरच दिल्या जातात. 

बातम्या आणखी आहेत...