आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीच्या शेवटच्या काळात घेतला अबॉर्शनचा निर्णय, पण 30 वर्षांनंतर जे सत्य समोर आले ते पाहून चकीत झाली महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोवा. अमेरिकेत राहणा-या अबॉर्शन सर्वाइव्हर महिलेची ही कथा आहे. तिला अबॉर्शननंतर मृत समजून हॉस्टपिटलमध्ये सोडून देण्यात आले होते. पण तिच्या नशीबाने अनेक प्रयत्नानंतरही ती जिवंत राहिली. तेव्हाच तिला जन्म देणा-या आईला याविषयी माहिती नव्हती. तिला एका कुटूंबाने दत्तक घेतले आणि चांगले संगोपन केले. तिने आपल्या बायोलॉजिकल आईचा शोध घेतला आणि जवळपास 30 वर्षांनंतर अचानक ती तिच्या समोर गेली. जी मुलगी 30 वर्षांपुर्वी मृत पावली असे ती महिला समजत होती, ती मुलगी आज तिच्या समोर होती. 

 

दोन नर्सने वाचवले प्राण
- लोवा येथे राहणा-या मेलिसा ओडेनने काही वर्षांपुर्वी अबॉर्शन सर्वाइव्हर म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव शेअर केला होता. 
- मेलिसाच्या आईने प्रेग्नेंसीच्या शेवटच्या काळात अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती जवळपास पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली. तिने सलाइन ड्रिप केली होती. 
- ड्रिपमध्ये अबॉर्शनसाठी लीथल डोजही देण्यात आले आणि ती लेबरमध्ये गेली. मेलिसाचा जन्म झाला, पण तिच्या आईला वाटले तिने अबॉर्टेड बेबीला जन्म दिला आहे. ती हॉस्पिटलमध्ये थँक्स म्हणून निघून गेली. 
- डॉक्टर्सनेही मेलिसाला मृत मानले होते. पण तिची आई गेल्यानंतर दोन नर्सची नजर त्या अर्भकावर पडली. त्यांनी पाहिले की, मुलगी जिवंत आहे त्यांनी तिला क्रिटिकल केअर यूनिटमध्ये दाखल केले.
- लीथल डोजमुळे मेलिसाचा मृत्यू झाला नव्हता, परंतु तिला गंभीर रेस्पिरेट्री आणि लिव्हर प्रॉब्लम्स झाल्या. डॉक्टरांना वाटत होते की, तिला वाचवणे अवघड आहे. 

 

एका कुटूंबाने घेतले दत्तक 
- मेलिसाला एका कुटूंबाने दत्तक घेतले. या काळात तिच्या सर्व मानसिक आणि शारीरिक अडचणी संपल्या होत्या. तिला मोठे झाल्यावर कळाले की, तिला तिच्या पालकांनी दत्तक घेतलेले आहे. 
- जेव्हा तिला तिच्या ख-या आईविषयी पालकांनी सांगितले तेव्हा ती मोठी आणि समजदार झाली होती. पण नंतर ती याचा सहज सामना करु शकली नाही. 
- हे ऐकल्यानंतर ती खुप त्रासात होती. एकाच रात्री ती अनेक इमोशंसचा सामना करत होती. यामुळे तिला अल्कोहलची सवय जडली. तिने ही गोष्ट आपल्या पालकांसमोर येऊ दिली नाही. 
- या दुःखातून बाहेर येण्यासाठी फक्त एकच पध्दत होती, ती म्हणजे आपल्या बायोलॉजिकल आईला आपल्या आयुष्यातून नेहमीसाठी काढून टाकावे आणि जे आहे ते स्विकारावे. 

 

जन्म देण्या-या पालकांना शोधून काढले 
- यानंतर मेलिसाने आपल्या बायोलॉजिकल पालकांना शोधण्याचा निर्णय घेतला. तिचा जिथे जन्म झाला होता, त्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला. तिच्या पालकांचे डीटेल्स तिने घेतले. 
- मेलिसाच्या बायोलॉजिकल वडिलांचे निधन झाले होते, परंतु तिची आई अजून जिवंत होती. यानंतर तिने एकदा अचानक आपल्या आईशी संपर्क केला आणि त्यांच्यासाठी त्यांची मृत मुलगी जिवंत झाली. 
- यानंतर दोघींमध्ये फोनवर बोलणे सुरु होऊ लागले आणि त्या तासंतास बोलू लागल्या. पण दोघींमध्येही एकमेकींचा सामना करण्याची आणि भेटण्याची हिंमत नव्हती. 
- जन्माच्या जवळपास 30 वर्षांनंतर मेलिसाने आपल्या जन्म देणा-या आईची भेट घेतली आणि मेलिसाच्या अपेक्षेपेक्षा ही भेट खुप चांगली होती. 
- ता काळात मेलिसाला कळाले की, तिच्या आईला किती पश्चाताप होत आहे. त्या काळात अबॉर्शन करण्यासाठी तिच्या पालकांनी तिच्यावर दबाव टाकला होता. हे तिने आपल्या मुलीला सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...