आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जणांनी 12 वर्षांच्या मुलीवर वर्षभर केला बलात्कार; आईनेच केली नराधमांची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांना जेवणात कालवून द्यायची औषध, मग घरात यायचे नराधम
  • गुजरातच्या भुतिया गावातील धक्कादायक घटना, आरोपी आई फरार

भावनगर - हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणात साऱ्या देशात बलात्काऱ्यांविरुद्ध रोष असताना गुजरातमध्ये एक घृणास्पद घटना समोर आली आहे. भावनगर जिल्ह्यातील भुतिया गावात एका 12 वर्षीय मुलीवर 3 नराधमांनी अत्याचार केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कृत्यासाठी नराधमांना पीडितेच्या आईनेच मदत केली. पोलिसांनी रविवारी यासंदर्भात तक्रार दाखल केली. या घटनेतील आरोपी आई सध्या फरार असून तिचा कसून शोध घेतला जात आहे.

लेकीसाठी वडिलांनी केली आईविरुद्ध तक्रार...

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तक्रार पीडितेच्या वडिलांनी दाखल केली आहे. "पीडितेच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्याची पत्नी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलीवर अत्याचार करण्यासाठी 3 पुरुषांची मदत करत होती." पीडित मुलीने सांगितले, की तिच्या वडिलांना आई नेहमीच काही तरी जेवणात मिसळून द्यायची. ते खाताच वडिल बेशुद्ध व्हायचे आणि नराधमांना ती घरात प्रवेश देत होती. यानंतर बळजबरी करून तिच्यावर अत्याचार केला जायचा. पोलिसांच्या तपासात या प्रकरणात शांती धंधुकिया (46), बाबुभाई सरतानपारा (43) आणि चंद्रेश सरतानपारा (32) यांची नावे समोर आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...