Home | National | Other State | Mother-in-law and father eaten poison After Rape Allegation By Daughter In Law

सुनेने केला असा आरोप की सासू-सासऱ्यांनी प्राशन केले विष, मोठी सून म्हणाली- निर्दोष आहेत सासरे, बरबाद झाले कुटुंब

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 10:57 AM IST

सुनेने बलात्काराचा आरोप केल्यामुळे एका बुजुर्ग दांपत्याने विष प्राशन केले. यातील सासूचा मृत्यू झालेला आहे.

 • Mother-in-law and father eaten poison After Rape Allegation By Daughter In Law

  सांपला (हरियाणा) - एका बुजुर्ग दांपत्याने विष प्राशन केल्यामुळे कुटुंब उद्धवस्त झाले आहे. विष प्राशन करणाऱ्या बुजुर्ग दांपत्यातील 52 वर्षीय निर्मला यांचा मृत्यू झालेला आहे. 54 वर्षीय परमानंद पीजीआयमध्ये जीवन-मृत्यूशी संघर्ष करत आहेत. परमानंद यांच्यावर त्यांच्या मधल्या मुलाच्या पत्नीने 22 ऑगस्ट रोजी पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यात परमानंद यांच्या पत्नी, दोन मुलांवर गंभीर आरोप केले होते. सूत्रांनुसार, हा धक्का सहन न झाल्याने बुजुर्ग दांपत्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी याप्रकरणी बुजुर्ग दांपत्याच्या मोठ्या मुलाच्या तक्रारीवरून त्याची सून, सुनेचे वडील, दोन भाऊ आणि इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

  12 वर्षांपासून कॅन्सरने ग्रस्त होते रेपचे आरोपी सासरे
  सुनेवर रेप केल्याचा आरोप असलेले 54 वर्षीय परमानंद गावात किराणा दुकान चालवतात. त्यांना मागच्या 12 वर्षांपासून कॅन्सर आहे. दीर्घकाळापासून ते रोहतक पीजीआयमध्ये उपचार घेत आहेत. गावकऱ्यांच्या मते, परमानंद यांचे वागणे माणुसकीचे होते. त्यांची दोन मुले रोहतकमध्ये ऑटो चालवतात. परमानंद यांचा मोठ्या आणि मधल्या मुलाचे लग्न एकाच घरातील दोन सख्ख्या बहिणींशी झालेले आहे. दोन्ही बहिणींपैकी छोटीने आपल्या सासऱ्यावर रेपचा आरोप केला होता. तर मोठ्या मुलाची सून आपल्या बहिणीच्या आरोपांवरून सासऱ्याला निर्दोष असल्याचे सांगत आहे.

  बलात्काराची तक्रार देणाऱ्या छोटी सुनेची बहीण म्हणाली- मुलांची बाजू घेणे सासऱ्याला महागात पडले
  - विष प्राशन करणारे परमानंद यांच्या 3 मुलांपैकी 2 मुलांचे लग्न भिवानी जिल्ह्यातील एका गावात दोन सख्ख्या बहिणींशी झालेले आहे. परमानंद यांच्यावर या बहिणींपैकी छोटीने रेपचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे रेपची तक्रार देणाऱ्या विवाहितेची मोठी बहीण म्हणाली की, माझे सासरे निर्दोष आहेत.
  - या सुनेचे म्हणणे आहे की, 5 दिवसांपूर्वी छोटी बहीण मुलांना काहीही कारण नसताना मारहाण करत होती. सासऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केल्यावर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर छोटीने माहेरी फोन करून घरच्यांना बोलावले.

  - 21 ऑगस्ट रोजी आमच्या माहेरचे आले तर तेव्हाही सासरे आणि माझ्या पतीचा वाद झाला. यावर छोट्या सुनेने एक दिवसानंतर सासऱ्याविरुद्ध रेप आणि पती, दीर व सासूविरुद्ध अनेक आरोप करत केस नोंदवली. समाजात झालेल्या बदनामीमुळे सासऱ्यांना मोठा धक्का बसला होता.

Trending