आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Story: मधुचंद्राच्या रात्री सासूच्या खोलीत झोपला पती, मग एका रात्री तिने लपून पाहिले पतीचे 'ते' सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- कोणतीही तरुणी अनेक स्वप्न घेऊन लग्न झाल्यानंतर सासरी येते. तशीच स्वप्ने उराशी बाळगून असलेली येथील एक युवती लग्न होऊन पतीच्या घरी आली. परंतू एक दोन नाही तर तब्बल एक आठवडा पती तिच्याजवळ आला नाही. त्यानंतर नवविवाहितीच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. एके रात्री तिने पती काय करतो, याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

 

> पतीच्या लीला पाहिल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिचा पती साडी नेसून महिलेसारखा साज-श्रृगांर करुन नाचत होता. सूनेने याची माहिती सकाळी सासू-सासऱ्यांना दिली. त्यानंतर सासू जे काही म्हणाली त्यामुळे नवविवाहितेच्या पायाखालची जमीन सरकली. सासू म्हणाली, तुझा पती जर तुझी इच्छापूर्ती करीत नसेल तर माझा पती ते काम करेल. सासूच्या या बोलण्याने असह्य वेदना झालेल्या युवतीने कोर्टाचे दार ठोठावले.


मधुचंद्राच्या रात्री पती आईच्या खोलीत जाऊन झोपला...
- अहदाबादमधील बापूनगर येथील युवतीचे समाजातील एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलासोबत लग्न झाले. इतर मुलींप्रमाणे नवविवाहिता सासरी आली. तिला पहिला धक्का बसलो तो मधुचंद्राच्या रात्री. त्या रात्री पती तिच्यासोबत राहाण्याऐवजी त्याच्या आईच्या रुममध्ये जाऊन झोपला. असे एक-दोन आठवडे सुरु होते. अनेकदा तो पत्नी झोपेपर्यंत तिच्यारुममध्ये राहात होता आणि पत्नी झोपल्यानंतर गायब होत होता. एके दिवशी पत्नीने पती रोज रात्री कुठे जातो याचा शोध घेण्याचे ठरविले. तिने जे काही पाहिले त्याने तिला धक्काच बसला.


पती साडी नेसून करत होता डान्स
- विवाहितेचा आरोप आहे की तिचा पती आईची साडी नेसून रात्रीचा डान्स करतो. केवळ तो साडीच नेसत नाही तर एखाद्या नवविवाहितेप्रमाणे साज-श्रृंगार करतो. त्याच्या हातात बांगड्या असतात. असे रोज रात्री सुरु होते. यामुळे विवाहिता भयभीत झाली. एकदा त्यांच्या घरी किन्नर आले होते. त्यातील एकाने म्हटले, मुली तुझे लग्न चुकीच्या ठिकाणी झाले. तुझा पती आमच्या पैकी एक आहे. लवकरच तुला हे कळेल.


सूनेला सासऱ्यासोबत झोपण्यासाठी सासू करायची आग्रह
- पतीच्या या तऱ्हेवाईक वागण्याचा पत्ता लागल्यानंतर नवविवाहितेने सर्वात पहिले सासू-सासऱ्यांना सांगितले. त्यानंतर सूनेच्या छळाचे सत्र सुरु झाले. सासू तिला रोज धमकावत होती. माझा मुलगा जर तूला सुख देऊ शकत नसेल तर माझा पती तुझी इच्छापूर्ण करेल, सासूने असे म्हटल्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एक दिवस सासूने बळजबरी तिचा हात पकडून तिला सासऱ्याच्या खोलीत नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सासू म्हणाली होती, मला तर माझा वंश पुढे न्यायचा आहे.


पित्याच्या मृत्यूनंतर विवाहिता झाली हतबल
- दरम्यानच्या काळात युवतीच्या वडिलांचे निधन झाले. या आघाताने ती शारीरिक आणि मानसिकदृष्टीने खचून गेली. एक दिवस सासरच्या लोकांनी मारहाण करुन तिला घरातून बाहेर काढले. त्यानंतर जवळचे नातेवाईक आणि वकीलांशी संपर्क करुन आपल्या माहेरी निघून गेली. विवाहितेने पतीची एचआयव्ही- एड्सची चाचणी करण्यात यावी असा अर्ज दिला. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, दरम्यान पीडितेने कोर्टात खटला दाखल केला.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज.... 

 

बातम्या आणखी आहेत...