सुनेचे वय कळताच / सुनेचे वय कळताच सासूने मुलाकडे घेतली धाव; म्हणाली- चुकूनही नवरीला स्पर्श करू नकोस, नाहीतर तिचे भविष्य खराब होईल

दिव्य मराठी वेब टीम

Dec 08,2018 12:05:00 AM IST

हिम्मतनगर (गुजरात) - कॅन्सरशी झुंजताना पतीचा मृत्यू झाला. दीर्घ काळ पतीवर उपचार केल्याने कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. पैशांच्या अडचणीमुळे आईने आपल्या अल्पवयीन मुलीचा पैसे घेऊन आंतरजातीय विवाह लावला. याबदल्यात तिला एक लाख रुपये मिळाले. आणि ही मुलगी ज्याची नवरी बनून गेली, त्याला सामाजिक कारणांमुळे लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती. यामुळे त्याच्या लग्नच जमत नव्हते. पैसे देऊन लग्न लावल्यानंतर नववधूच्या सासूला कळले की, आपली सून ही अल्पवयीन आहे, तेव्हा सासूने हेल्पलाइन 181 वर फोन करून याची माहिती दिली. कारण, मुलीला आणखी शिकण्याची इच्छा होती.

मजबुरीने आईने एक लाख रुपये घेऊन मुलीचे लग्न लावले...
सासूने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आधी या अल्पवयीन मुलीच्या आईला फोन केला, परंतु 3 आठवडे उलटले तरीही त्यांचा काहीच रिप्लाय आला नाही. अखेर सासूने पोलिसांना हस्तक्षेप करायला लावून या अल्पवयीन मुलीला पुन्हा आपल्या आईकडे पाठवले. अल्पवयीन मुलगी हिम्मतनगर जिल्ह्यातल्या भिलोडा तालुक्यातील आहे. नोव्हेंबरमध्ये तिच्या आईने एक लाख रुपये घेऊन आंतरजातीय विवाह लावला होता.

आईने घातली मुलाची समजूत, नवरीला स्पर्शही करू नकोस...
नवरदेवाच्या आईला नवरी अल्पवयीन असल्याचे कळताच तिने पोलिसांना कळवण्यासोबतच मुलाचीही समजूत घातली की, नवरीला स्पर्शही करू नकोस. तिच्यापासून दूरच राहा. जेणेकरून सुनेचे भविष्य खराब होऊ नये.

समुपदेशक बिनलबेन म्हणाल्या- पैसे खर्च झाल्याने मुलीला घ्यायला येत नव्हती आई...
हेल्पलाइनच्या समुपदेशक बिनलबेन पटेल म्हणाल्या की, या अल्पवयीन मुलीने बोलताना सांगितले की, तिचे बळजबरी लग्न लावून देण्यात आले आहे. तिला आणखी शिकायचे आहे. सध्या सासूसोबतच राहते. परंतु तिला परतही जायचे आहे, पण आई घ्यायलाच येत नाही. आम्ही या मुलीच्या आईशी संपर्क करून त्यांनी कायद्याची माहिती दिली, तेव्हा कुठे त्या मुलीला आपल्यासोबत घेऊन गेल्या. मुलीच्या सासूची भूमिका प्रशंसनीय आहे. एक लाख रुपये जे दिले होते, ते मुलीच्या आईकडून खर्चही होऊन गेले. यामुळे अडचण येत होती. यावर मुलाचे कुटुंब म्हणाले की, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, तेव्हा परत द्या. अशा प्रकारे ही अल्पवयीन मुलगी परत आपले भविष्य घडवण्यासाठी पुन्हा आईकडे राहायला गेली.

X
COMMENT