social / सासूच्या पार्थिवाला 4 सुनांचा खांदा, बीडकरांनी अनुभवला सासू-सुनांच्या नात्यातील भावनिक प्रसंग

बीडकरांनी अनुभवला सासू-सुनांच्या नात्यातील भावनिक प्रसंग

Sep 10,2019 09:26:49 AM IST

बीड : सासूबाईंनी आम्हाला त्यांच्या मुलीप्रमाणे वागवले. कधीही भेदभाव केला नाही, असे सांगत येथील चारही सुनांनी सासूबाईच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पार्थिवाला खांदा दिल्याचा भावनिक प्रसंग शहरातील काशीनाथनगरमध्ये सोमवारी पाहावयास मिळाला. मुलांनी व जावयांनी सासूबाईंना खांदा दिला, परंतु आमच्या आईला (सासूबाईंना) आम्हीही खांदा देणार, अशी भूमिका चारही सुनांनी घेतली.


शहरातील काशीनाथनगर येथील रहिवासी सुंदरबाई दगडू नाईकवाडे (८४) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सुंदरबाई यांना नवनाथ, राधाकिसन, जालिंदर, मच्छिंद्र ही चार मुले व मुलगी रुक्मिणी अशी पाच अपत्ये. सुंदरबाईंनी चारही सुनांना मुलींप्रमाणे वागवले. सुनांचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम होते. सकाळी सुंदरबाई यांची अंत्ययात्रा निघाली असता प्रथम मुलांनी, जावयांनी खांदा दिला. हे पाहून सुना लता, उषा, मनीषा व मीना यांनी या आमच्या आई आहेत, आम्हीही त्यांना खांदा देणार, असे सांगत चौघींनीही सासूच्या पार्थिवाला खांदा दिला.

X