आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Irmelin Worried About Son Leonardo DiCaprio's Flirty Behavior, Wants Leo To Propose Girlfriend Camilla

मुलगा लिओनार्डो डिकॅप्रिओच्या फ्लर्टी स्वभावामुळे आई इर्मलिन चिंतेत, गर्लफ्रेंड कॅमिलाला लिओनो प्रपोज करावे अशी आहे इच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्कः ऑस्कर पुरस्कारप्राप्त अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओची आई इर्मलिनची इच्छा आहे की, लिओने लवकरात लवकर त्याची मैत्रीण कॅमिला मॉरॉनला प्रपोज करावे. इंग्रजी वेबसाइट रॅडरऑनलाइनच्या म्हणण्यानुसार, इर्मलीन यांना भीती आहे की, लिओ त्याच्या फ्लर्टी वृत्तीमुळे चांगली मुलगी गमावेल. लिओ आणि कॅमिली यांना बर्‍याच वेळा सार्वजनिकपणे स्पॉट केले गेले. विशेष म्हणजे अभिनेता काही काळापूर्वी प्रसिद्ध मॉडेल कँडल जेनरसोबत एका क्लबमध्ये देखील दिसला होता.

  • कॅमिला ही अल पचिनोची मुलगी आहे...

वेबसाइटनुसार, इर्मलिन त्यांचा मुलगा लिओ आणि  त्याची गर्लफ्रेंड कॅमिलासमवेत सुटीसाठी इटलीला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कॅमिलाला सून करुन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या मुलाच्या फ्लर्टी स्वभावामुळे त्यांना काळजी वाटते. विशेष म्हणजे कॅमिला ही हॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अल पचीनोची मुलगी आहे.

  • कँडल जेनरसोबत दिसला होता लिओ..

'टायटॅनिक'मध्ये जॅकची भूमिका साकारणारा लिओ काही काळापूर्वी कँडल जेनरसोबत दिसला होता. वेबसाइटनुसार, दोघांनी क्लबच्या बूथमध्ये बराच काळ एकत्र घालवला होता. महत्त्वाचे म्हणजे या काळात कॅमिला माराकेच फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती.

बातम्या आणखी आहेत...