आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच 4 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा, मग नाक केले बंद; पतीला म्हणाली- आता सर्वांनाच मुक्ती मिळाली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये आईच्या निष्ठूर कृत्याची घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. आईने आपल्या हातानेच मुलीचा जीव घेतला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना इंदिरानगर परिसरातील आहे.

 

असे आहे प्रकरण...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. पोलिस पोहोचले तेव्हा बेडवर तान्हुलीचा मृतदेह होता. तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. पतीच्या तक्रारीवरून महिलेला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने आपला गुन्हाही कबूल केला आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, मी चांगली आई बनू शकत नव्हते. म्हणून मुलीची हत्या केली. आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

 

डिप्रेशनने ग्रस्त आहे महिला...
सूत्रांनुसार, निर्दयीपणे आपल्या 4 महिन्यांच्या निरागस मुलीला मारणाऱ्या शुभ्रा तिवारीला डिप्रेशनचा त्रास आहे. तणावात येऊनच तिने हे पाऊल उचलले. महिलेचा पती इंजिनिअर आहे आणि गुजरातेत नोकरी करत होता, परंतु पत्नीच्या अशा वागण्यामुळेच त्याला सर्वकाही सोडावे लागले. पतीने गुजरातेतील नोकरी सोडली होती आणि मागच्या 6 महिन्यांपासून तो पत्नीसोबतच राहत होता. महिलेचा पती म्हणाला की, शुभ्रावर होमियोपॅथीची ट्रीटमेंटही सुरू होती. आरोपी महिलेचे वडील निवृत्त मुख्याध्यापक आहेत. पोलिसांनी मुलीचा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करवून घेतले.

 

मी सर्वांनाच मुक्ती दिली...
आरोपी आईने पोलिसांना सांगितले की, तिने आधी मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला, मग तिचे नाक दाबून बंद केले. यातच तान्हुलीचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री शुभ्रा आपली मुलगी अद्वितासोबत रूममध्ये झोपलेली होती, तर तिचा पती बृजनंदन तिवारी बाहेरच्या रूममध्ये झोपलेला होता.

बृजनंदनने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सकाळी त्याची पत्नी शुभ्राने रूमबाहेर येऊन सांगितले की, तिने मुलीला ठार करून सर्वांना मुक्ती दिली आहे. जेव्हा त्यांनी मुलीचा मृतदेह पाहिला तेव्हा लगेच पोलिसांना फोन केला. चौकशीत शुभ्र म्हणाली की, मी चांगली आई बनू शकत नव्हते म्हणून तिला मारले.


महिलेचे होते लव्ह मॅरेज...
पोलिसांनुसार, सन 2009 मध्ये बृजनंदन आणि शुभ्राने लव्ह मॅरेज केले होते. यानंतर तीन वेळा शुभ्राचा गर्भपात झाला होता. यानंतर तिने मुलीला जन्म दिला होता. पोलिसांच्या मते, शुभ्राला डिप्रेशनचा त्रास होता. तथापि, पोलिस इतर काही कारणे आहेत का, याचा तपास करत आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...